वयाची ४० ओलांडूनही फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरुक असलेली अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती या वयातही अनेक तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. ती एक उत्तम अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे. मलायका ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाच्या बॉडीगार्डने केलेल्या कृत्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मलायका सध्या 'झलक दिखला जा ११' या शोमध्ये परिक्षक म्हणून दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मलायकाने लाल रंगाची वेस्टर्न साडी नेसली होती. या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट आणि सेक्सी दिसत आहे. मलायका 'झलक दिखलाजा'च्या सेट बाहेर येऊन फोटोग्राफर्ससोबत फोटो काढण्यासाठी येते. तेवढ्यात एक दिव्यांग चाहता मलायकासोबत फोटो काढण्यासाठी येतो. मलायका स्वत: त्या चाहत्याला फोटो काढण्यासाठी शेजारी बोलावते.
वाचा: टप्पू ते दयाबेन; दिलीप जोशीच्या मुलाच्या लग्नात कलाकारांची हजेरी
तो चाहता मलायकाच्या कंबरेवर हात ठेवताना दिसतो. ते पाहून मलायकाचा बॉडीगार्ड मागून पळत येतो आणि मागे येऊन त्या चाहत्याचा कंबरेवरचा हात हळूच खाली काढतो. मलायकाने मात्र यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, त्याला अत्यंत प्रेमाने वागणूक देत त्याच्याबरोबर तिने फोटो काढला. त्या चाहत्याला मलायकाच्या एवढ्या जवळ आलेले पाहिल्यावर तिथे उपस्थित असलेले बाऊंसर्सदेखील आ वासून उभे राहिलेले पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून बऱ्याच लोकांनी मलायकाच्या स्वभावाचे कौतुक केले आहे तर काहींनी त्या चाहत्याला अन् बाऊन्सर्सना ट्रोल केले आहे.
संबंधित बातम्या