मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मलायका आणि अर्जुनमध्ये सध्या काय चाललंय? 'ही' पोस्ट सर्व काही सांगून जाते!

मलायका आणि अर्जुनमध्ये सध्या काय चाललंय? 'ही' पोस्ट सर्व काही सांगून जाते!

Jun 26, 2024 05:03 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे दोघे वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. आता तिची पोस्ट चर्चेत आली आहे.

malaika arora and arjun kapoor
malaika arora and arjun kapoor

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या दोघांनीही याबाबत कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तर, मलायकाच्या टीमकडून ब्रेकअपची बातमी चुकीची असल्याचं म्हटलं गेलं आहे. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. आज (२६ जून') अर्जुन कपूरचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने आदल्या रात्री त्याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या पार्टीत मलायका अरोरा सहभागी झाली नाही. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

इतकंच नाही तर, अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मलायकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही पोस्ट केलेली नाही. आता मलायका कामात व्यस्त असेल असं म्हणावं, तर तिने यादरम्यान एक खोचक पोस्ट केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘माझं अशा लोकांवर प्रेम आहे, ज्यांच्यावर मी डोळे बंद करून आणि माझ्या पाठीमागेही विश्वास ठेवू शकते.’ आता मलायकाच्या या पोस्टचा अर्थ कुणालाच लागत नाहीये. मात्र, पोस्ट वाचून सगळेच चकित झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज
मलायकाची पोस्ट
मलायकाची पोस्ट

Gharoghari Matichya Chuli: रणदिवे कुटुंबाला मिळणार सौमित्रच्या लग्नाचं आमंत्रण! ऐश्वर्या घालणार मोठा गोंधळ

मलायका आणि अर्जुन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१९मध्ये या दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. दरम्यान, पिंकविलाने काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनचे नाते एका वेगळ्या वळणावर आले असल्याचे म्हटले होते. दोघांच्याही हृदयात एकमेकांसाठी खास स्थान असले, तरी या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून, या मुद्द्यावर ते दोघेही चुप्पी साधणार आहेत, असे म्हटले होते.

Tharala Tar Mag: जे घडायला नको तेच घडणार! अर्जुन-सायली नव्या संकटात अडकणार; ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

दोघांमध्ये चांगले नाते होते, परंतु दुर्दैवाने हे सर्व आता संपले असल्याचे म्हटले जात आहे. याचा अर्थ असा नाही की, दोघांमध्ये एकमेकांबद्दल कटुता आहे. दोघेही एकमेकांचा आदर करतात. आता या दोघांचे नाते खूप वर्षांचे असल्याने हा भावनिक वेळ घालवण्यासाठी दोघेही आपापला पूर्ण वेळ घेत आहेत.

अर्जुनच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर तो आता ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. अर्जुन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून, काही दिवसांपूर्वी त्याचे पोस्टरही रिलीज करण्यात आले होते. यामध्ये त्याचा लूक खूपच धमाकेदार होता आणि प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

WhatsApp channel