बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज २६ जून रोची ३९वा वाढदिवस आहे. तो साजरा करण्यासाठी त्याने मध्यरात्री भव्य पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली. त्यामध्ये जान्हवी कपूर, शनाया कपूर, मोहित मारवाह, संजय कपूर, महीप कपूर आणि इतर काही कलाकार होते. हे कलाकार अर्जुनच्या घराबाहेर दिसले होते. पण अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोरा कुठेही दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे.
अर्जुन कपूरच्या पार्टीत कुटुंबातील बहुतेक सदस्य उपस्थित होते आणि कदाचित अर्जुनने बुधवारी मलायकासोबत कुठे तरी खासगी वेळ घालवण्याची व्यवस्था केली असण्याची शक्यता आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही आपले नाते अधिकृत केले आहे. पण अद्याप लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. यापूर्वी अनेकदा अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, अर्जुन किंवा मलायका या दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
वाचा: शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' होणार ओटीटीवर प्रदर्शित? वाचा कधी आणि कुठे
गेल्या महिन्यात अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पार्टीत मलायकाची अनुपस्थितीही ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे.
वाचा: 'या' कारणामुळे वर्षातून ६ महिने आईसोबत एका घरात राहते सई ताम्हणकर
येत्या काळात अर्जुन कपूरचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकीकडे तो 'मेरी पत्नी का रिमेक' या चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार आहे. तर दुसरीकडे रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्येही तो एण्ट्री करताना दिसत आहे. तो अजय देवगणसोबत 'सिंघम अगेन' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो डेंजर लंका ही भूमिका साकारणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळणार आहे.
वाचा: अद्वैतने सर्वांस
अर्जुनचा वाढदिवस तोंडावर असताना मलायका अरोरा मैत्रिणींसोबत बाली आणि लंडनला फिरायला जाताना दिसली. तिचे फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या फोटोंवर अनेकांनी अर्जुन कुठे आहे? असा प्रश्न देखील विचारला होता. आता अर्जुनच्या पार्टीमध्ये देखील मलायका गैरहजर असल्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे.
संबंधित बातम्या