मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Malaika Arora: ब्रेकअपनंतर मलायकाने चक्क 'या' अभिनेत्यासोबत केला डान्स Video viral

Malaika Arora: ब्रेकअपनंतर मलायकाने चक्क 'या' अभिनेत्यासोबत केला डान्स Video viral

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 03, 2024 05:07 PM IST

Malaika Arora Viral Video: मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका अभिनेत्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

Malaika Arora Dance Video
Malaika Arora Dance Video

Malaika Arora Dance Video: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून मलायका अरोरा ओळखली जाते. वयाची ४० ओलांडूनही मलायका अतिशय हॉट आणि बोल्ड दिसते. तिचे फोटो सतत चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. काही दिवसांपूर्वी मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाला. त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अशातच मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका अभिनेत्यासोबत डान्स करताना दिसत आहे. आता हा अभिनेता कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मलायका अरोरा झलक दिखला जा ११ मध्ये जजच्या भूमिकेत आहे. झलक दिखला जा ११ ची एक खास पार्टी नुकताच पार पडलीये. या पार्टीला अनेक कलाकार उपस्थित राहिले. सध्या पार्टीतील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सर्वजण धमाल करत आहेत. मात्र, यावेळी सर्वांचे लक्ष हे मलायका अरोराकडे जाताना दिसत आहे.
वाचा: अनंत अंबानीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमासाठी रिहानाने किती पैसे घेतले? मानधन वाचून बसेल धक्का

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका शोएब इब्राहिमसोबत डान्स करताना दिसत आहे. ते दोघेही छैया छैया गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. मलायकाच्या डान्स मूव्ह या पाहण्यासारख्या आहेत. दरम्यान, मलायकाने काळ्या रंगाच्या ब्रालेट आणि शिमरी पँट घातल्याचे दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. मलायका ब्रेकअप नंतर पुन्हा सर्वांमध्ये एकत्र मजामस्ती करताना पाहून चाहते आनंदी धाले आहेत.
वाचा: बॉक्स ऑफिसवर यामी गौतमची जादू, ८ दिवसात सिनेमाने कमावले कोट्यवधी रुपये

मलायका अरोराच्या छैया छैया गाण्याने इंटरनेटचा चांगलाच पारा वाढल्याचे बघायला मिळत आहे. झलक दिखला जा ११ मध्ये अनेकदा मलायका अरोरा ही डान्स करताना दिसली. इतकेच नाही तर नोरा फतेहीसोबत देखील मलायका अरोराने खास डान्स केला. मलायका अरोराचा जेवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला, ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली.
वाचा: चॅनेलचा दबाव झुगारून...; ‘मुलगी झाली हो’चा उल्लेख करत किरण मानेची पोस्ट

काही दिवसांपूर्वी फराह खानने ‘झलक दिखला जा'च्या मंचावर मलायकाला प्रश्न विचारला होता की नव्या वर्षात म्हणजे २०२४मध्ये लग्न करणार का? तर, यावर उत्तर देताना मलायका म्हणाली होती की, ‘कुणी असेल तर मी त्याच्याशी नक्कीच लग्न करेन. कुणी मला विचारलं तर हो मी लग्न करेन.’ मलायकाच्या या वक्तव्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग