बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणून मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ओळखले जातात. पण काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जेव्हा अर्जुन कपूरसमोर मलायकाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला तेव्हा त्याने स्वत:ला सिंगल असल्याचं सांगितलं होतं. अर्जुन म्हणाला होता, 'नाही, नाही! सध्या मी सिंगल आहे, रिलॅक्स व्हा. ते उंच आणि देखणे बोलले, जणू ते लग्नाबद्दल बोलणार आहेत. म्हणून मी बोलत आहे.'
अर्जुनच्या या वक्तव्यानंतर काही तासांनी मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक कोट शेअर केला आहे. "जर कोणी एका सेकंदासाठीही एखाद्याच्या हृदयाला स्पर्श केला तर तो आयुष्यभर त्याच्या आत्म्याला स्पर्श करतो" या आशयाचा हा कोट आहे. या कोटच्या खाली मलायकाने गूड मॉर्निंग असे म्हटले आहे. हे कोट शेअर करताना मलायकाने स्वत: काहीही लिहिले नसले तरी लोक तिच्या पोस्टला अर्जुनच्या स्टेटमेंटशी जोडत आहेत.
वाचा: लसणाच्या पाकळ्या खाऊन 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने काढले दिवस, विनय आपटेंना कळाले अन् बदलले आयुष्य
ब्रेकअपनंतर कपल्स एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो करत असले तरी मलायका आणि अर्जुनने तसे केले नाही. इन्स्टाग्रामवर ते एकमेकांना फॉलो करत आहेत. ते एकमेकांच्या पोस्टचा आदर करत आहेत. या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम फीडवरून एकमेकांचे फोटोही डिलीट केलेले नाहीत. इतकंच नाही तर अडचणीच्या वेळी दोघेही एकमेकांना साथ देत आहेत. नुकतेच मलायकाचे वडील अनिल मेहता यांचे निधन झाले तेव्हा अर्जुन तिला आधार देण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. तो मलायकासोबत उभा होता.
अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायकाने नव्या आयुष्याला सुरुवात केली. 2017 मध्ये अरबाज आणि मलायका यांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुन हे 2018 मध्ये एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा होती. आता ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे.