एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणून अरबाज खान आणि मलायका अरोरा ओळखले जायचे. पण एक दिवस अचानक त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आता अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केले. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता एका कार्यक्रमात मलायका अरोरा आणि शुरा खान आमनेसामने आल्याचे म्हटले जात आहे.
अरबाज खानने दुसरे लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच मलायका आणि शुरा समोरासमोर आल्या आहेत. या कार्यक्रमात शुरा आणि अरबाज हातात हात पकडून एण्ट्री करताना दिसले. त्यावेळी त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर याच कार्यक्रमात मलायका अरोरा आणि तिची आई देखील हजर होते. मलायकाची आई सलीम खान यांच्या गाडीतून आली होती. त्यामुळे या कार्यक्रमात मलायका आणि शुरा पहिल्यांदाच भेटल्या आहेत. त्या दोघींमध्ये संवाद झाला की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वाचा: कसा आहे करीना आणि तब्बूचा 'क्रू' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
नेटकऱ्यांना मलायका आणि शुरा यांच्या भेटी बद्दल कळताच अनेकांना दोन्ही कुटुंबियांमधील नाते आवडल्याचे म्हटले आहे. तर काही यूजरने कमेंट करत त्यांना ट्रोल केले आहे. सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज हे मुलगा अरहान खानसाठी अनेकदा एकत्र येताना दिसले आहेत. त्यांचे विमानतळावरील देखील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अरहान वडिलांच्या दुसऱ्या लग्नात उपस्थित होता. त्याने एक गाणे देखील सादर केले होते.
वाचा; ओंकार भोजने दिसणार महेश मांजरेकरांसोबत, सिनेमाच्या पोस्टने वाढवली उत्सुकता
मलायकाने अरबाजला घटस्फोट दिला त्यानंतर अभिनेता अर्जुन कपूरची तिच्या आयुष्यात एण्ट्री झाली. २०१९मध्ये मलायका आणि अर्जुनने त्यांच्या नात्याची कबूली दिली. पण आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. आता मलायका कोणाला डेट करत आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.