Malaika Arora-Arjun Kapoor Viral Video:बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्या अफवांना उधळून लावतही जोडी अनेक वेळा एकत्र फिरताना आणि एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसते. आता देखील ब्रेकअपच्या अफवांदरम्यान, पुन्हा एकदा दोघेही शनिवारी सकाळी अमृता अरोराच्या मुंबईतील पार्टीला एकाच कारमधून जाताना दिसले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले आहेत. त्यांनी मुंबईत पार पडलेल्या एका लग्न सोहळ्याला एकत्र हजेरी लावली होती. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा कारच्या मागील सीटवर एकत्र बसलेले दिसत आहे. यावेळी मलायका अरोरा पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. तर, यासोबत तिने मॅचिंग ब्लेझर घातला होता. तर, अभिनेता अर्जुन कपूर ब्लॅक आउटफिटमध्ये त्याच्या लेडी लव्हला मॅच करताना दिसला.
गेल्या काही दिवसांपासून अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत होता की, मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप झाले आहे. मात्र, आता ते त्यांच्या प्रेमाला दुसरी संधी देण्याचा विचार करत आहेत, असेही म्हटले जात होते. त्यांच्या कथित ब्रेकअपमागील अफवांचे कारण त्यांच्या लग्नाचा विषय होता, असे म्हटले जात आहे. लग्नावरून दोघांमध्ये मतभेद होते, असे म्हटले गेले होते. दोघांपैकी एकाला लग्न करायचे आहे, तर दुसरा त्यासाठी तयार नाही, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात होते.
मात्र, हिंदुस्तान टाइम्सच्या मीडिया रिपोर्टनुसार, मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या अफवांमध्ये तथ्य नसल्याची पुष्टी या महिन्याच्या सुरुवातीला एका सूत्राने केली होती. रिपोर्टनुसार, यासूत्राने म्हटले होते की, 'जेव्हा लोक बघतात की, ते दोघे एकमेकांसोबत पोस्ट शेअर करत नाहीत, तेव्हा ते समजतात की दोघे वेगेळे झाले आहेत. आपण असं काही नसतं. मलायका तिची बहीण अमृतासोबत सुट्टीवर गेली होती आणि लोकांना वाटले की, दोघे वेगळे झाले आहेत. हा किती मूर्खपणा आहे? उलट त्यांचे नाते अधिक मजबूत होत आहेत. आता लग्न करणं किंवा न करणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते इतके दिवस एकत्र आहेत, आता त्यांच्यात लग्नावरून वाद का होतील? ते एकमेकांशी वचनबद्ध आहेत आणि त्यांच्या नात्यात कोणतीही अडचण नाही.’