Malaika-Arjun: युरोपच्या रस्त्यांवर आलाय प्रेमाचा बहर; मलायका-अर्जुनची रोमँटिक व्हेकशन ट्रीप!
Malaika Arora And Arjun Kapoor Romantic Vacation : बॉलिवूडची ही स्टार जोडी अर्थात अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहेत. हे कपल युरोपमध्ये एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवत आहे.
Malaika Arora And Arjun Kapoor Romantic Vacation : सध्या बॉलिवूड विश्वात सध्या अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांची प्रेमकथा तुफान चर्चेत आहे. दोघांच्या वयामध्ये मोठं अंतर असलं, तरी यांच्या प्रेमाला मात्र वयाची मर्यादा नाही. सोशल मीडियावर दोघेही अनेकदा आपले रोमँटिक फोटो शेअर करत असतात. तर, आपापल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडासा वेळ काढून ते नेहमी एकमेकांसोबत रोमँटिक ट्रीप प्लॅन करतात. आता देखील ही लव्ह बर्ड जोडी युरोपमध्ये भटकंती करत आहे. नुकतेच त्यांनी त्यांच्या युरोप ट्रीपमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
बॉलिवूडची ही स्टार जोडी अर्थात अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहेत. हे कपल युरोपमध्ये एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवत आहे. नुकतेच अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल एकमेकांसोबत कोजी होताना दिसत आहे. मलायकाने या ट्रीपमधील तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारून पोज देताना दिसत आहेत.
Rang Maza Vegla: अखेर उलगडा होणार! कार्तिक नव्हे ‘या’ व्यक्तीने संपवलं साक्षीचं आयुष्य
दोघांचे हे रोमँटिक फोटो शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'उबदार आणि आरामदायक. जेव्हाही मी तुझ्याजवळ असते, तेव्हा मला असेच वाटते.’ या कॅप्शनसह तिने अर्जुन कपूरलाही टॅग केले आहे. याआधीही या कपलने त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दोघांचे क्युट आणि रोमँटिक फोटो पाहून चाहते त्यांना लग्न कधी करणार हा प्रश्न सतत विचारत आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे. या दरम्यान मलायका आणि अर्जुन कधी लग्नाची बातमी देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांची लव्हस्टोरी आता काही वर्षे जुनी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीला दोघांनीही त्यांचे नाते सगळ्यांपासून लपवून ठेवले. मात्र, काही महिन्यांनी त्यांनी एकत्र पार्टी आणि इव्हेंटला उपस्थित राहण्यास सुरुवात केली. यानंतर सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत त्यांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.