बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे आवडते व लाडके कपल म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. दोघेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा मलायका आणि अर्जुनने प्रेमाची कबूली दिल्यानंतर सुरु झाल्या. पण आता दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. पण खरच असे काही झाले आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूरची एण्ट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकत्र आहेत. शिवाय दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरु आहे. एका कार्यक्रमात मलायकाने दुसरे लग्न करणार असल्याची देखील कबुली दिली. असे असताना देखील मलायका आणि अर्जुन याच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
वाचा: "पुन्हा संसार थाटणार", अरबाजच्या लग्नानंतर मलायकाचे दुसऱ्या लग्नाबाबत मोठे वक्तव्य
मलायका ही गेल्या काही दिवसांपासून एकटीच दिसत आहे. सतत एकत्र फिरणारे कपल एकत्र दिसत नसल्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. ख्रिसमस पार्टीला देखील मलायकासोबत अर्जुन दिसला नव्हता. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये मलायका एकटीच दिसत होती. तसेच आता मलायका सलॉनबाहेर देखील एकटीच दिसली.
सलॉन बाहेरचा मलायकाचा व्हिडीओ पाहून एका यूजरने ‘ चांगले आयुष्य होते, पण अर्जुन याच्या नादात सर्वकाही खराब करुन ठेवले आहे…’ अशी कमेंट केली. दुसऱ्या एका यूजरने ‘अर्जुन कपूर कुठे आहे? आता तुम्ही दोघे एकत्र का नाही दिसत?' असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या