Malaika Arora And Arjun Kapoor Break Up: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपवर आता अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या अभिनेत्याने शेवटी स्वतःला ‘सिंगल’ म्हणवले आहे. दोघांच्या ब्रेकअपची बातमी खूप दिवसांपासून चर्चेत होती. पण, काही दिवसांपूर्वी जेव्हा मलायकाच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा अर्जुन या वाईट काळात तिच्यासोबत उभा राहिलेला दिसला होता, तेव्हा या चर्चा अफवा असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, आता अर्जुनने नुकत्याच केलेल्या वक्तव्याने सर्व काही स्पष्ट झाले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
नुकताच अर्जुन कपूर राज ठाकरेंच्या दिवाळी पार्टीत दिसला होता. यावेळी जेव्हा त्याला मलायकाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने हसून उत्तर दिले, 'नाही, मी सध्या सिंगल आहे, थोडं रीलॅक्स करा.' त्याच्या या वक्तव्यानंतर आता मलायकासोबतचे नाते संपल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यूजर्स त्यावर अनेक कमेंट करत आहेत. अर्जुनने पहिल्यांदाच जाहीरपणे हे कबुल केले आहे की, तो आता सिंगल आहे आणि मलायकासोबत त्याचा ब्रेकअप झाला आहे.
गेल्या ६ महिन्यांपासून अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत होत्या. काही महिन्यांपूर्वी अर्जुन आणि मलायका इव्हेंटमध्ये वेगवेगळे स्पॉट झाले होते, तेव्हापासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. या वर्षी जूनमध्ये अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीला बी-टाऊनचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पण, मलायका या पार्टीत गायब होती. इतकेच नाही, तर अलीकडे मलायकाच्या वाढदिवसादिवशी अर्जुनने तिला सोशल मीडियावर विशही केले नाही. त्यावरूनच हे स्पष्ट झाले होते की, ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता त्यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मलायकाने अर्जुनच्या कुटुंबाला सोशल मीडियावरून अनफॉलो केले होते आणि तेव्हापासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.
सध्या दोघांच्या ब्रेकअपचे कारण समोर आलेले नाही. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार मलायका अर्जुनशी लग्न करू इच्छित होती. परंतु, अर्जुनला फक्त आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करायचे होते. मागच्या वर्षी करण जोहरच्या शोमध्ये आलेल्या अर्जुनला मलायकासोबत लग्न करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा, अभिनेत्याने सांगितले होते की, या सर्व गोष्टींबद्दल एकट्याने बोलण्याची ही योग्य वेळ नाही. मलायकासोबत आल्यावरच मला याबाबत बोलायला आवडेल, असेही अर्जुन म्हटले होते. मात्र, आता दोघे यावर काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.