
बॉलिवूडमधील ९०च्या दशकातील सध्याच्या घडीला अतिशय लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल असे मलायकाचे वयाच्या ४७व्या वर्षी सौंदर्य आहे. ती अनेकदा फिट राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी टीप्स देताना दिसते. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे.
नुकताच मलायकाने झी मराठी अवॉर्ड्स म्हणजेच नात्यांचा महाउत्सव या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मलायकाने 'ऐका दाजीबा' गाण्यावर ठेका धरला आहे. त्यासाठी तिने मराठमोळा लूक देखील केला आहे. कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, हातात लाल बांगड्या, केसात गजरा असा सुंदर मराठमोळा लूक मलायकाने या गाण्यासाठी केला आहे. तिचा या लूकमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: कार्तिकी गायकवाडने खरेदी केलेली नवी कार पाहिलीत का?
मलायकाने या पुरस्कार सोहळ्यात केवळ डान्स केलेला नाही तर श्रेया बुगडे कडून बेसनाचे लाडू बनवायला शिकून घेतले आहे. हे खास लाडू मलायका सारेगामा लिटिल चॅम्प्सचे परीक्षक सलील कुलकर्णींना देणार आहे. एकंदरीत मलायकाने या कार्यक्रमात धमाल केली आहे. आता हा पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे पाहायला मिळणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात मलायकासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील उपस्थित राहणार आहे.
संबंधित बातम्या
