Malaika Arora New Business : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाला आता बराच काळ लोटला असून दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दुसरीकडे, तिचं अर्जुन कपूरशी असलेलं नातं देखील तुटलं आहे. मलायका तिचा मुलगा अरहानच्या खूप जवळ आहे आणि दोघेही एकमेकांना खूप सपोर्ट करतात. आता या दोघांनी स्कार्लेट हाऊस नावाने एक नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. वांद्रे येथील पाली व्हिलेजमध्ये हे त्यांचे आलिशान हॉटेल आहे.
आर्किटेक्चरल डायजेस्टने (एडी) दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील ९० वर्षे जुन्या इंडो-पोर्तुगीज बंगल्यात हे रेस्टॉरंट खास डिझाइन करण्यात आले आहे. त्यात जुन्या पद्धतीचे इंटेरियर आणि साधेपणा यांचे मिश्रण आहे. एडीने त्याचे अनेक इनसाइड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात विंटेज इंटिरियर दिसत आहे.
रेस्टॉरंटमध्ये लाकडी बीम, सुंदर झालर, विंटेज डिनवेअर, विंटेज स्टाईलचे फर्निचर इत्यादींचे सौंदर्य देखील सुंदर इंटिरिअर फोटोंमध्ये पाहायला मिळतात. या फोटोंमध्ये रेस्टॉरंटचं सौंदर्य देखील पाहायला मिळत आहे. मुख्य आर्किटेक्ट निशी पारेख यांनी एडीला सांगितले की, "या ठिकाणचे बरेच सजावटीचे दिवे पॅरिसमधील वीकेंड मार्केटमधून खरेदी केले गेले आहेत. कॅफेमध्ये प्रवेश केल्यावर लाकडी शेल्फवर ठेवलेली सिरॅमिक क्रॉकरी दिसेल. या हस्तनिर्मित वस्तूंवरून असे दिसून येते की, या वास्तूचा प्रत्येक कोपरा अगदी अनोखा, भव्य आणि विंटेज आहे.
या रेस्टॉरंटसाठी मलायकाची थीम शांत, उबदार आणि लक्झरी होती. यामाध्यमातून तिथे येणाऱ्या लोकांना असे वातावरण द्यायचे होते, ज्यात कोणी आत शिरले तर, तासनतास आतमध्ये राहू शकते. नुकतेच मलायका आणि अरहान देखील या रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले होते. या डोंघाणी इथे भरपूर फोटो काढले होते. दोघेही आपल्या मित्रांसोबत डिनर एन्जॉय करण्यासाठी आले होते. यावेळी दोघांनीही खूप चांगले आउटफिटपरिधान केले होते. मलायकाने ब्लॅक अँड व्हाईट ब्लेझर, ब्लॅक पँट आणि पांढरा शर्ट घातला होता.
या नव्याकोऱ्या आलिशान रेस्टॉरंटच्या ओपनिंगनंतर आता सर्वजण मलायका आणि अरहानचे सोशल मीडियावरून अभिनंदन करताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला वेगवेगळ्या जेवणाच्या पदार्थांची खूप आवड आहे आणि ती त्यासाठी कुठेही प्रवास करून जाऊ शकते. तिने आजवर जगातील अनेक वेगवेगळ्या प्रवास करत, तिथल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. यामुळेच तिला रेस्टॉरंट उघडण्याची कल्पना सुचली.