विनोदाची धमाल! मकरंद आणि सिद्धार्थचा 'एक डाव भूताचा' या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  विनोदाची धमाल! मकरंद आणि सिद्धार्थचा 'एक डाव भूताचा' या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

विनोदाची धमाल! मकरंद आणि सिद्धार्थचा 'एक डाव भूताचा' या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 30, 2024 03:29 PM IST

'एक डाव भूताचा' हा मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधवचा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

ek dav Bhootacha
ek dav Bhootacha

आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी एक वेगळी छाप उमटवली आहे. त्यांची हसण्याची विशिष्ट पद्धत ही प्रेक्षकांना खूप आवडते. काही दिवसांपूर्वी त्यांचा 'एक डाव भूताचा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

'एक डाव भूताचा' या चित्रपटात स्मशानात जन्मलेल्या आणि सतत भूत पाहणाऱ्या मदनची हि कहाणी आहे. त्याचं मधुमती नावाच्या मुलीवर प्रेम असतं पण ते प्रेम व्यक्त करायची त्याची हिंमत होत नसते. अशातच शशिकांत नावाचं भूत मदनला मधुमतीचं प्रेम जिंकून देण्यास मदतीचा हात पुढे करतो, पण त्याच्या बदल्यात एक अट घालतो. ती अट नेमकी काय? हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. आणि आता हा सिनेमा तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

कुठे आणि कधी पाहाता येणार सिनेमा?

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना 'एक डाव भूताचा' हा सिनेमा घर बसल्या पाहाता येणार आहे. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ३१ ऑक्टोबर २०२४ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
वात: दादा कोंडकेंच्या 'त्या' कृत्यामुळे ओशोंनी बोलावले होते भेटायला, वाचा नेमकं काय झालं होतं?

कोणते कलाकार आहेत सिनेमात?

'एक डाव भूताचा' या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे.

Whats_app_banner