आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल करताना थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा ‘अल्याड पल्याड' चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेते मकरंद देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया चित्रपटाविषयी...