मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट आणि सीरिज येताना दिसत आहेत. हे नवे प्रयोग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना देखील दिसत आहेत. काही मराठी चित्रपटांनी तर राष्ट्रीय पातळीवर मोहोर उमटवली आहे. आता आणखी एक वेगळ्या विषयावर आधारित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे नाव 'मानवत मर्डर' असे आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
'मानवत मर्डर' या सीरिजच्या ट्रेलरची सुरुवात ही मानवत या गावातून होते. या गावात दीड वर्षामध्ये सात खून झालेले असतात. या खुनांचे रहस्य उलगडण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. या खूनात कोणाचा वैयक्तिक हेतू आहे याचा अंदाज पोलीस अधिकाऱ्याने लावला आहे. आता हा पोलीस अधिकारी गावातील आरोपीला शोधून काढणार का? की स्वत: या सगळ्या अडचणीत अडकणार का? असा प्रश्न ट्रेलर पाहून पडत आहे. तसेच ट्रेलरच्या शेवटी एक वृद्ध महिला 'अकरा बकरा उकरा, मला पुरुन टाका!' हा डायलॉग बोलताना दिसत आहे. तिच्या या डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
'मानवत मर्डर' या सीरिजमध्ये सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे दिसणार आहेत. दोघांचा ही लूक पाहण्यासारखा आहे. तसेच सई ताम्हणकरच्या लूकने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच आशुतोष गोवारीकर या वेब सीरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांचा हा अगळावेगळा लूक पाहाता सर्वजण सीरिजबाबत उत्सुक आहेत. तसेच ‘अबीर गुलाल’ या मालिकेत श्रीची भूमिका साकारणारी पायल जाधव देखील दिसणार आहे. एकदंरीत सीरिजची स्टार कास्ट पाहात सर्वांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
वाचा: बॉलिवूडमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा यूट्यूबवर प्रदर्शित! बजेट ४५ कोटी आणि कमाई ०.०१ कोटी
'मानवत मर्डर' ही वेब सीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये मराठी कलाकारांची फौज आहे. तसेच या कलाकारांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या सीरिजकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.