मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे आणि सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. "दे धक्का" सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. त्यांनतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली नाही. प्रेक्षकांना ही जोडी एकत्र पाहण्याची इच्छा होती. आता प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. सिद्धार्थ आणि मकरंद हे दोघेही एका चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाचे नाव 'एक डाव भुताचा' असे आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या या चित्रपटाविषयी...
"एक डाव भूताचा" या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याचेच प्रतिबिंब दिसते. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे मकरंद आणि सिद्धार्थच्या दमदार अभिनयासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मकरंद आणि सिद्धार्थसोबतच अभिनेत्री मयूरी देशमुख देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
वाचा : ‘तारक मेहता . . . ’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!
"एक डाव भूताचा" चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे.
संबंधित बातम्या