मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कॉमेडीचा धक्का जोरात लागणार, मकरंद-सिद्धार्थच्या 'दे धक्का २'साठी प्रेक्षक सज्ज
दे धक्का २
दे धक्का २
15 June 2022, 16:19 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
15 June 2022, 16:19 IST
  • 'दे धक्का २' (de dhakka 2)ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.

लोकप्रिय मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरे (makarand anaspure)आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav) यांच्या विनोदाने सजलेला 'दे धक्का' प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना स्वतःच्या प्रेमात पाडलं. अनोखा विषय आणि कसलेले कलाकार यांसोबत 'दे धक्का' ने चाहत्यांची मनं जिंकली. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना जोरदार कॉमेडीचा धक्का द्यायला हे कलाकार सज्ज झाले आहेत. कधी हसवून तर कधी त्यांच्या डोळ्यात पाणी आणून प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच बहुप्रतीक्षित 'दे धक्का २' (de dhakka 2) चं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सिद्धार्थ जाधव सह इतर कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये पहिल्या चित्रपटातील संपूर्ण कास्ट दिसत आहे. मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा मकरंद जाधव ही भूमिका साकारत आहे. तर सिद्धार्थ धनाजी अन शिवाजी साटम हे सगळ्यांचे लाडके सूर्यभान जाधव म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही पोस्ट करत त्यांनी लिहिलं, ' मकरंद जाधव with धनाजी and gang...थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय, १ २ ३ ४ - "दे धक्का २" येतोय ५ ऑगस्ट २०२२ ला ..दिग्दर्शक - महेश मांजरेकर , सुदेश मांजरेकर'.

 

या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. 'दे धक्का २' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावतो हे पाहणं औसुक्याचं ठरेल.