मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhuri Dixit: यंदाची मकर संक्रांत माधुरी दीक्षितसोबत साजरी करायची? जाणून घ्या कशी

Madhuri Dixit: यंदाची मकर संक्रांत माधुरी दीक्षितसोबत साजरी करायची? जाणून घ्या कशी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 02, 2024 09:46 AM IST

Sankrant with Madhuri Dixit: माधुरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने १०१ महिलांना तिला भेटण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले आहे.

Madhuri Dixit
Madhuri Dixit (Instagram )

माधुरी दिक्षित… एक अशी तारका आहे जिच्या स्माईलवर सगळेच फिदा आहेत. जिच्या अदाकारीने अनेक जण घायाळ होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरूषांपासून स्त्रियांपर्यंत जगभरात तिचे असंख्य चाहते आहेत. अशा या आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची झलक पाहाण्याची, तिला भेटण्याची इच्छा अनेकांना असते. आता चाहत्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. जाणून घ्या कसे...

ट्रेंडिंग न्यूज

माधुरी दीक्षित निर्मित 'पंचक' हा चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे तिकिट बूक करताना 'बूक अँड विन' या कॉन्सेस्टमध्ये सहभागी होता येणार आहे. यामध्ये सहभागी होताना चित्रपटाच्या तिकिटासोबतचा फोटो शेअर करायचा आहे. त्यामधील १०१ बायकांना माधुरीला भेटण्याची संधी मिळणार आहे.
वाचा: अंडरवर्ल्ड डॉनच्या दबावामुळे मला...; सोनाली बेंद्रेने केला होता मोठा खुलासा

माधुरीने या कॅनटेस्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की, “खूप छान वाटते, जेव्हा चाहते माझ्या अभिनयाचे, नृत्याचे आणि हास्याचे कौतुक करतात. अनेक जण मेसेजेस करतात, अनेक जण भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. परंतु या सगळ्यांना भेटणे शक्य होत नाही. त्यामुळेच आमचा ‘पंचक’ चित्रपट नवीन वर्षात ५ जानेवारी प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने आम्ही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. जेणे करून मी माझ्या मैत्रिणींना भेटू शकेन. यावेळी महाराष्ट्रातील निवडक १०१ मैत्रिणींना मी ठाण्यात भेटून, त्यांच्यासोबत हळदी कुंकू साजरे करणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागणार आहे. ‘पंचक’ या चित्रपटाचे तिकीट बुक करून चित्रपटगृहात जाऊन आपला आणि तिकिटाचा फोटो काढून ‘पंचक’च्या अधिकृत इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर शेअर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार आहे, माझ्या आणि ‘पंचक’मघील खोतांच्या घरातील महिलांसोबत हळदी कुंकू समारंभ साजरा करण्याची. तर मग भेटुयात लवकरच."

‘पंचक’ या चित्रपटाची निर्मिती डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने यांनी केली असून राहुल आवटे आणि जयंत जठार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग