मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'माझी तुझी रेशीमगाठ'मधील ही अभिनेत्री सोडणार मालिका?
माझी तुझी रेशीमगाठ
माझी तुझी रेशीमगाठ (HT)
20 May 2022, 8:02 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
20 May 2022, 8:02 AM IST
  • सध्या सोशल मीडियावर 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांची आवडती मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ.' या मालिकेतील नेहा आणि परीच्या जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. आता या मालिकेतून एका अभिनेत्रीची एक्झिट होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत सिमी हे पात्र विशेष चर्चेत असते. या पात्राने तर अनेकांची मने जिकंली आहेत. सिमी ही भूमिका अभिनेत्री शीतल क्षीरसागर साकारत आहे. पण आता शीतलने मालिकेला रामराम ठोकला असल्याचे म्हटले जात आहे. हा चाहत्यांसाठी धक्काच आहे. पण शीतलने खरच मालिका सोडली आहे का? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शीतलने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती काही दिवसांपूर्वी 'आई कुठे काय करते' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होती. त्यानंतर का रे दुरावा, एक होती राजकन्या या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. शीतल गेली कित्येक वर्षे या चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. तिने 'आरंभ' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग