'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत

'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 27, 2024 01:27 PM IST

Mamta Kulkarni: 'करण अर्जुन' या चित्रपटात बिंदिया हे पात्र अभिनेत्री ममता कुलकर्णीने साकारले होते. ममताने १९९३साली टॉपलेस फोटोशूट करत सर्वांचे लक्ष वेधले होता. सध्या ममता काय करते? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. चला जाणून घेऊया...

Mamta Kulkarni
Mamta Kulkarni

शाहरुख खान आणि सलमान खानचा 'करण अर्जुन' हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमागृहात पुन्हा हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक गुगलवर ममता कुलकर्णीबद्दल सर्च करत आहेत. या चित्रपटात ममताने सलमानच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. तिची बिंदिया ही भूमिका विशेष चर्चेत होती. त्यांचं 'भंगड़ा पाले' हे गाणं खूप गाजलं होतं. आता ममता सध्या काय करते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया..

ममताच्या करिअरविषयी

ममता कुलकर्णीने करिअरची सुरुवात १९९१ मध्ये केली होती. 'नानबरगल' या तमिळ चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. त्यानंतर १९९२ मध्ये 'तिरंगा' आणि १९९३ मध्ये 'आशिक आवारा' या चित्रपटांमध्ये काम केले. या दोन्ही चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. ती 'वक्त हमारा है', 'क्रांतिवीर', 'करण अर्जुन', 'बाजी' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली.

मॅगझीनसाठी टॉपलेस फोटोशूट

ममता तिच्या चित्रपटांमुळे तर चर्चेत होतीच. पण, १९९३ साली तिने स्टारडस्ट मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तिने या मॅगझीनसाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. तिच्या टॉपलेस फोटोशूटमुळे बराच गदारोळ झाला होता.

ममता
ममता

ममताचे होते अंडरवर्ल्डशी संबंध

या फोटोशूटनंतर अभिनेत्रीने राजकुमार संतोषीचा 'चायना गेट' हा चित्रपट साइन केला होता. शूटिंग सुरू झाल्यानंतर राजकुमार संतोषी आणि ममता यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. अशा तऱ्हेने राजकुमार संतोषी यांनी ममताला चित्रपटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, ममताचे अंडरवर्ल्डशी इतके चांगले संबंध होते की, राजकुमार संतोषी तसे करू शकले नाहीत. त्यांना ममताला चित्रपटात ठेवण्यास भाग पाडले गेले.
वाचा: मुलीच्या मृत्यूने खचल्या होत्या अनुराधा पौडवाल, स्वप्नात झाला कालीमातेचा साक्षात्कार आणि...

ममता
ममता

२०१३मध्ये सोडली सिनेसृष्टी

सुरुवातीला ममताचं नाव डॉन छोटा राजनसोबत जोडलं गेलं. जेव्हा छोटा राजन पळून गेला तेव्हा ममताने विकी गोस्वामीला डेट करण्यास सुरुवात केली आणि त्याच्याशी लग्न केले. मात्र, ममताने या सर्व अफवा असल्याचे सांगत लग्नाच्या बातम्या फेटाळल्या. सतत वादात राहिल्यानंतर ममता साध्वी बनली. तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. २०१३मध्ये तिने 'ऑटोबायोग्राफी ऑफ अॅन योगिनी' या पुस्तकाचे प्रकाशन केले तेव्हा चित्रपटसृष्टीला निरोप देण्याचे कारण सांगितले. "काही माणसे जगाच्या कामांसाठी जन्माला येतात, तर काही देवासाठी जन्माला येतात. माझा जन्मही देवासाठीच झाला आहे" असे ममता म्हणाल्या.

Whats_app_banner