मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Eknath Shinde: हीच का ती हिंदुत्वासाठीची लढाई?; महेश टिळेकर यांची खोचक पोस्ट

Eknath Shinde: हीच का ती हिंदुत्वासाठीची लढाई?; महेश टिळेकर यांची खोचक पोस्ट

Payal Shekhar Naik HT Marathi
Jun 23, 2022 05:30 PM IST

Mahesh Tilekar on Eknath Shinde Revolt: या सगळ्या प्रकरणावर अनेक मराठी कलाकारांनी पोस्ट करत आपली मतं मांडली. आता लोकप्रिय दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी एक पोस्ट करत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला आहे.

महेश टिळेकर
महेश टिळेकर

Maharashtra Political Crisis: गेल्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या वातावरणात प्रचंड मोठी उलथपालथ झाली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाइव्ह येत भावनिक आवाहन केलं. मात्र त्यानंतर एकनाथ यांनी त्यांच्या मागण्या मांडणारं ट्विट केलं आणि ते शिवसेनेत परत येणार नसल्यावर शिक्कमोर्तब झालं. आपण हिंदुत्ववादी असल्याचं ट्विट देखील त्यांच्याकडून करण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकरणावर अनेक मराठी कलाकारांनी पोस्ट करत आपली मतं मांडली. आता लोकप्रिय दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी एक पोस्ट करत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला आहे.

एकनाथ यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला. आणि आता या गटाला भाजप कडून मोठी ऑफर देण्यात येत आहे अशा बातम्या प्रसारमाध्यमांवर येत आहेत. ही गोष्ट लक्षात आणून देत टिळेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शिंदे यांना खोचक प्रश्न विचारला आहे. एका वाहिनीवर शिंदे यांना भाजपकडून २ केंद्रीय मंत्रिपदं, राज्यात ५ मंत्रिपदं आणि ८ कॅबिनेट मंत्रिपदं देण्याची ऑफर देण्यात आल्याचा फोटो शेअर करत टिळेकर यांनी प्रश्न विचारत लिहिलं, 'हीच का हिंदुत्वासाठीची लढाई?' टिळेकर यांच्या पोस्टवर अनेकांनी त्यांना दुजोरा दिला आहे.

 

<p>mahesh tilekar fb post</p>
mahesh tilekar fb post

टिळेकर यांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं, 'लढाई हिंदुत्वासाठी कधी होती?' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'गुजरातच्या दावणीला बांधलेलं हिंदुत्व आहे हे, भाजपमध्येही प्रवेश करतील हे.' आणखी एका युझरने लिहिलं, '१३ मंत्रिपदं आता त्यावरून गुवाहाटीमध्ये हाणामारी लागू नये म्हणजे मिळवलं.'

IPL_Entry_Point