मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुक्ता बर्वेच्या 'वाय' चित्रपटाचं महेश टिळेकरांनी केलं कौतुक; म्हणाले, ‘थिएटर..’
महेश टिळेकर
महेश टिळेकर
24 June 2022, 13:03 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 13:03 IST
  • चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही त्याच्या विषयाबद्दल प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट नक्की कशा संबधित आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे (mukta barve) हिचा 'वाय' (Y)चित्रपट आज २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. समाजातील गंभीर विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही त्याच्या विषयाबद्दल प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट नक्की कशा संबधित आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. अशातच लोकप्रिय मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर (mahesh tilekar) यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. एक पोस्ट करत त्यांनी सगळ्यांनी हा चित्रपट प्रेक्षकगृहातच जाऊन पाहायला हवा असं आवाहन केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महेश यांनी चित्रपटाच्या पोस्टर सोबत एक फोटो शेअर करत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कलाकार आणि दिग्दर्शकांचं देखील कौतुक केलं आहे. चित्रपटाचं कौतुक करताना महेश यांनी लिहलं, '#Y #YTheFilm चित्रपटातील लहान मोठ्या भूमिका करणाऱ्या सर्वच कलाकारांचा सहज सुंदर अभिनय, उत्कंठा वाढवत गुंतून ठेवणारं लेखन दिग्दर्शन आणि सामाजिक भाष्य करत विचार करायला लावणारा एक अप्रतिम सिनेमा #Y. थिएटर मध्येच जाऊन आवर्जून पहावा असा.' महेश यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

<p>y movie</p>
y movie

'आम्हीही हा चित्रपट नक्कीच पाहू', 'आम्ही संध्याकाळी जाणार आहोत चित्रपट पाहायला' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.'वाय' चित्रपटात मुक्तासोबत नंदू माधव, ओमकार गोवर्धन, प्राजक्ता माळी अशी तगडी स्टारकास्ट आहे.