मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ज्येष्ठ नागरिक की वेस्ट नागरिक; महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'चा टीझर पाहिलात का?

ज्येष्ठ नागरिक की वेस्ट नागरिक; महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'चा टीझर पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 20, 2024 01:07 PM IST

Juna Furniture Teaser: महेश मांजरेकर महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक की वेस्ट नागरिक; महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'चा टीझर पाहिलात का?
ज्येष्ठ नागरिक की वेस्ट नागरिक; महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'चा टीझर पाहिलात का?

Mahesh Manjrekar upcoming movie: मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर ओळखले जातात. बोलण्याची वेगळी स्टाइल, उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. त्यांची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली आहे. आता लवकरच त्यांचा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'जुनं फर्निचर' या चित्रपटात ७१ वर्षीय एका वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित असल्याचे दिसत आहे. टीझरमध्ये महेश मांजरेकर "या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!" असा डायलॉग बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा डायलॉग लक्षवेधी ठरत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडला येणारा भारदस्त आवाज, दमदार व्यक्तीमहत्व एकंदरीत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहे. एकंदरीत या चित्रपटात आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आजकाल तरुण पिढी ही वयस्कर व्यक्तींना पाहून 'ओल्ड फर्निचर' असे बोलताना दिसतात. पण त्यांच्या मनातील हिच भावना खोडून काढण्याचा निर्णय महेश मांजरेकरांनी घेतला आहे. या चित्रपटात मल्टीस्टारर असलेला हा एका कौटुंबिक चित्रपट असल्याचे स्पष्ट होत आहे.
वाचा: असले फालतू उपदेशाचे डोस...; 'घरोघरी मातीच्या चुली'वर प्रेक्षकांचा संताप

'जुनं फर्निचर' या चित्रपटात महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर हे कलाकार दिसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, पटकथा आणि संवाद हे महेश मांजरेकरांचे आहेत. हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: त्या चित्रपटाच्या वेळी माझं ब्रेकअप झालं; प्राजक्ता माळीचे खासगी आयुष्यावर वक्तव्य

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मत मांडले. तेव्हा ते म्हणले की हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यापैकीच हा 'ओल्ड फर्निचर' म्हणजेच 'जुनं फर्निचर' देखील ट्रेंड मध्ये असतो. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना 'जुनं फर्निचर' असे म्हणतात. परंतु हेच जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार असल्याची माहिती महेश मांजरेकर यांनी दिली आहे. या चित्रपटात भावना दडलेल्या आहेत. चित्रपटगृहातून बाहेर पडताना 'जुनं फर्निचर'बद्दलचा दृष्टिकोन बदलावणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीमही अतिशय दमदार आहे. पुढे महेश मांजरेकर यांनी सांगितले की निर्माते यतिन जाधवसोबतही यापूर्वी मी 'दे धक्का २' केला होता. त्यामुळे एकंदरच ही मस्त भट्टी जमून आली आहे. आता सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

IPL_Entry_Point