मराठमोळे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. चित्रपटाची हटके कथा प्रेक्षकांच्या मनाला चांगलीच भावली. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया कधी आणि कुठे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्त्वावर भाष्य करणारा हा 'जुनं फर्निचर' चित्रपट वेगळ्या कथेमुळे पहिल्या दिवसापासूनच चर्चेत होता. या चित्रपटात वृद्धापकाळात पोहोचल्यावर आपलीच मुले आपल्याला कशा प्रकारे नाकारतात आणि त्याकाळात शरीर काम करत नसल्यामुळे पैसे नसल्यामुळे होणारे हाल या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. परंतू एक म्हातारा बाप देखील त्याच्या मुलाला योग्य पद्धतीने उत्तर देतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची वेगळी कथा सर्वांच्या पसंतीला उतरली होती. चित्रपटाच्या कमाईविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. हवा तसा प्रेक्षकांच्या प्रतिसाद मिळाला नाही. आता घरबसल्या सिनेमा पाहायला मिळणार असल्यामुळे मात्र प्रेक्षक खूश आहेत.
वाचा: मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का
'जुनं फर्निचर' या चित्रपटातील अभिनेता भूषण प्रधानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत 'या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा! वास्तवाचे भान दाखविणारा, बापाच्या वेदनेची आर्त हाक देणारा 'जुनं फर्निचर ' सिनेमा आता अॅमेझॉन प्राईमवर' असे कॅप्शन दिले आहे. भूषणची ही पोस्ट पाहून चाहते आनंदी झाले आहेत.
वाचा: 'प्रेमासाठी लढणार', ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन
'जुनं फर्निचर' या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता अखेर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
वाचा: लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानी यांची खास तयारी, खरेदी केलेल्या नव्या साडीची किंमत माहिती आहे का?
संबंधित बातम्या