अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 29, 2024 09:38 AM IST

'जुनं फर्निचर' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेते महेश मांजरेकर हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या चित्रपटाने किती कमाई केली आहे हे समोर आले आहे.

अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये
अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

गेल्या काही दिवसांपासून मराठमोळे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत होता. आता अखेर २६ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या तीन दिवसात या चित्रपटाने किती कमाई केली असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाची कमाई किती झाली...

ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्त्वावर भाष्य करणारा हा 'जुनं फर्निचर' चित्रपट वेगळ्या कथेमुळे पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात वृद्धापकाळात पोहोचल्यावर आपलीच मुले आपल्याला कशा प्रकारे नाकारतात आणि त्याकाळात शरीर काम करत नसल्यामुळे पैसे नसल्यामुळे होणारे हाल या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. परंतू एक म्हातारा बाप देखील त्याच्या मुलाला योग्य पद्धतीने उत्तर देतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची वेगळी कथा सर्वांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे.
वाचा: सलूनच्या बाहेर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकरने केली मेजशीर पोस्ट, म्हणाला 'अपून तो हिरो बनगया!'

चित्रपटाने किती केली कमाई?

‘जुनं फर्निचर… या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !' या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांमध्ये किती कमाई केली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने माहिती दिली आहे. चित्रपटाने तीन दिवसांमध्ये किती कमाई केली हे समोर आले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी जवळपास ४० लाख रुपये कमावले आहेत. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ७७ लाख रुपये कमावले आहेत. तसे पाहायला गेलो तर चित्रपटाची कमाई हवी तितकी झालेली नाही. तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. चित्रपटाने जवळपास १.२ कोटी रुपये कमावले आहेत. आता पर्यंत तीन दिवसात चित्रपटाने २.९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...

चित्रपटातील कलाकारांविषयी

'जुनं फर्निचर' या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
वाचा: लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

Whats_app_banner