Mahesh Manjrekar: महेश मांजरेकरांच्या 'काळे धंदे' सीरिजला बीडमध्ये विरोध
Kale Dhande web series: २०१९ साली प्रदर्शित झालेल्या या सीरिजला आता का विरोध होत आहे हे जाणून घ्या…
अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटामुळे वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर 'नाय वरण भात लोणचा कोन नाय कोनचा' या चित्रपटावरुनही वाद निर्माण झाला होता. आता महेश मांजरेकर यांची 'काळे धंदे' ही सीरिजी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
बीड जिल्ह्यात महेश मांजरेकर यांच्या 'काळे धंदे' या चित्रपटाला विरोध केला जात आहे. तेथील बँड पथकांनी महेश मांजरेकर यांच्याविरोधात अँट्रोसिटी अतंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
वाचा: भूतकाळाची सावली बदलणार भविष्यकाळाची दिशा! नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
काळे धंदे ही वेब सीरिज २०१९ साली झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये शुभंकर तावडे आणि निरंजन जावीर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये एका बँड पथकाला लग्नसोहळ्यात खालच्या दर्जाची वागणू देण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. या सीनमुळे महाराष्ट्रातील डीजे आणि बँड पथकांची मने दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही सीरिज त्यावेळी प्रचंड गाजली होती.
आता महेश मांजरेकर यांच्या विरोधात बीडमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. ही सीरिजमधील तो सीन हटवण्याची मागणी केली जात आहे. तसेच महेश मांजरेकरांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.