बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे वडील महेश भट्ट अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत असतात. महेश भट्ट आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील कायमच चर्चेत राहिले आहेत. महेश भट्ट यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव हे पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि धाकट्या मुलीचे नाव शालिन भट्ट आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले आलिया आणि शालिनचे नाव मुस्लीम का ठेवले आहे. चला जाणून घेऊया काय होते नेमके कारण?
१९९८ साली महेश भट्ट यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्याचे वडील नानाभाई भट्ट गुजराती होते आणि आई शिरीन मोहम्मद अली मुस्लिम होती. जेव्हा त्यांच्या आई शिरीन मूळची मुस्लीम आहे हे इतरांना सांगायची वेळ यायची तेव्हा थोडं घाबरायची. पण जेव्हा महेश भट्ट यांनी मुलींची नावे मुस्लीम ठेवली आलिया आणि शाहिन तेव्हा तर त्यांच्या आईला धक्काच बसला होता.
महेश भट्ट यांनी रेडिफला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, 'मला दोन्ही विश्व जगण्याचा आनंद मिळाला. माझी आई शिया मुस्लिम होती आणि वडील जानोई समुदायातील पुरुष होते. त्यांनी कधीही सेक्युलर असल्याचे भासवले नाही. विशेष म्हणजे दोघेही आपापल्या धर्माला मानत होते. दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम, पण एकमेकांना आपापल्या परीने जगण्याचे स्वातंत्र्य होते. ते कधीच एकमेकांवर कोणतीही गोष्ट लादत नलत.'
महेश भट्ट यांनी १९९२ साली झालेल्या जातीय दंगलीच्या वेळी त्यांच्या आईला किती वाईट वाटले होते याबाबत देखील वक्तव्य केले. "माझी आई नेहमी कपाळाला मोठी टीकली लावायची आणि साडी नेसलायची. तिला साडी नेसायला आवडायचे. पण सोबतच मी हे देखील पाहिले की ती अनेक गोष्टी लपवत देखील असे. जेव्हा कधीही मी बोलताना पटकन माझी मुस्लीम मुळे सांगायचो तेव्हा तिला संकोच वाटायचा. १९९२ साली जेव्हा जातीय दंगली झाल्या तेव्हा माझ्या आईला खूप वाईट वाटले होते. त्यानंतर मी माझ्या दोन्ही मुलींची नावे मुस्लीम ठेवल्यामुळे तिला भीती वाटली होती. पण आलिया आणि शाहीन ही दोन्ही नावे माझी पत्नी सोनीला आवडली होती" असे महेश भट्ट म्हणाले.
वाचा: 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी
१९७० साली महेश भट्ट यांनी लॉरिन ब्राइटशी लग्न केले होते. लग्नानंतर तिने नाव बदलून किरण भट्ट केले होते. त्यांना राहुल आणि पूजा ही दोन मुले. पण सतत भांडणे होत असल्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. १९८६ साली महेश भट्ट यांनी पुन्हा सोनी राजदानशी लग्न केले. त्यांना दोन मुली. ज्यांची नावे महेश भट्ट यांनी आलिया आणि शाहीन ठेवली. १९९३ साली जन्मलेली आलिया आज सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरशी लग्न केले आहे. तिला राहा नावाची मुलगी आहे.
संबंधित बातम्या