Mahesh Bhatt: मुलीसोबतचा किसिंग सीन ते दारुचा नाद; जाणून घ्या महेश भट्ट यांच्याविषयी काही खास गोष्टी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahesh Bhatt: मुलीसोबतचा किसिंग सीन ते दारुचा नाद; जाणून घ्या महेश भट्ट यांच्याविषयी काही खास गोष्टी

Mahesh Bhatt: मुलीसोबतचा किसिंग सीन ते दारुचा नाद; जाणून घ्या महेश भट्ट यांच्याविषयी काही खास गोष्टी

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 20, 2023 07:30 AM IST

Mahesh Bhatt Birthday: आज महेश भट्ट यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

Film director Mahesh Bhatt
Film director Mahesh Bhatt

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय फिल्ममेकर म्हणून महेश भट्ट ओळखले जातात. त्यांचा आज, २० सप्टेंबर रोजी त्यांचा ७४वा वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे महेश भट्ट हे कायमच चर्चेत होते. त्यांचा एक फोटो तर असा होता ज्यामध्ये ते स्वत:च्या मुलीला लिप किस करताना दिसत होते. या फोटोवरुन खूप मोठा वाद झाला होता. अनेकांनी महेश भट्ट हे वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फारत आहेत असे म्हटले होते. तर दुसरीकडे महेश भट्ट हे दारुच्या आहारी गेल्याच्या देखील चर्चा सुरु होत्या.

८०च्या दशकात महेश भट्ट यांनी किरणशी लग्न केले होते. त्यांना पूजा आणि राहुल ही दोन मुले. पूजाने अगदी कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा पाहिला चित्रपट 'डॅडी' गाजला होता. या चित्रपटात तिने बोल्ड सीन दिले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. त्यासाठी मुलीला स्वत:च्या चित्रपटात बोल्ड सीन द्यायला लावल्यामुळे महेश भट्ट यांच्यावर टीका झाली होती.

दरम्यान, या चित्रपटासाठी एका मॅगझिनसाठी महेश भट्ट यांनी फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये त्यांनी मुलगी पूजा भट्टला लिप किस केले होते. हा फोटो मॅगझिनच्या फ्रंट पेजवर छापून आला आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला.

दारुच्या आहारी गेलेले महेश भट्ट

महेश भट्ट प्रचंड दारु प्यायचे. त्यांच्या दारुच्या चर्चा सर्वत्र सुरु होत्या. मात्र एक वेळ अशी आली की महेश भट्ट यांना दारु सोडावी लागली होती. भट्ट हे किती दारू पित असत आणि दारू सोडण्यासाठी कोणती घटना कारणीभूत ठरली याचा किस्सा खुद्द भट्ट यांनी सांगितला होता.

भट्ट यांच्यानुसार एकदा एका फिल्मी पार्टीतून उशिरा रात्री ते जुहू येथील जेव्हीपीडी स्कीम येथून चालत त्यांच्या लोखंडवाला कॉम्पलेक्स येथील घरी परत जात होते. ते पार्टीत जरी भरपूर मद्य प्यायले होते तरी आपण पार्टीच्या ठिकाणाहून जवळ असलेल्या घरी पायी चालत जाऊ शकतो असा विश्वास त्यांना होता. परंतु काही अंतर चालत गेल्यानंतर ठेच लागून ते जमिनीवर पडले आणि रात्रभर तसेच फुटपाथवर पडून होते. पहाटे तांबडे फुटले तेव्हा त्यांना जाग आली… आपण रस्त्याच्या कडेला एका दगडी खडीच्या ढिगावर संपूर्ण रात्र उताणे पडून होतो, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे पाकिट चोरीला गेले होते. उठून आपण तडक घरी गेलो. मात्र घरी कुणाला हा किस्सा सांगितला नव्हता, असे भट्ट यांनी स्वत: सांगितले होते.

Whats_app_banner