Sitara: व्वा! शाब्बास पोरी! महेश बाबूची लेक सितारा आयुष्यातील पहिल्या कमाईचं काय करणार? ऐकाच...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sitara: व्वा! शाब्बास पोरी! महेश बाबूची लेक सितारा आयुष्यातील पहिल्या कमाईचं काय करणार? ऐकाच...

Sitara: व्वा! शाब्बास पोरी! महेश बाबूची लेक सितारा आयुष्यातील पहिल्या कमाईचं काय करणार? ऐकाच...

Published Jul 16, 2023 09:42 AM IST

Sitara’s First Salary: महेश बाबूची मुलगी सितारा घट्टमनेनी नुकतीच टाइम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली स्टारकिड बनली. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी ती एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे.

Sitara Ghattamaneni
Sitara Ghattamaneni

Sitara’s First Salary: साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा घट्टामनेनी सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. महेश बाबूची मुलगी सितारा घट्टमनेनी नुकतीच टाइम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली स्टारकिड बनली. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी ती एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. ४ जुलै रोजी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर तिची जाहिरात दाखवण्यात आली. या जाहिरातीसाठी सिताराला तब्बल एक कोटी रुपये फी म्हणून मिळाल्याचे म्हटले गेले होते. तर, आता सिताराने तिची पहिली कमाई कशी खर्च केली ते देखील समोर आले आहे.

महेश बाबूची मुलगी सितारा घट्टामनेनी हिने तिला या जाहिरातीतून मिळालेला पहिला पगार एका धर्मादाय संस्थेला दान केला आहे. सिताराने हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिची आई नम्रता शिरोडकर हिच्यासोबत तिच्या नावाचे एक लूक बुकही लाँच केले आहे. यावेळी सितारा म्हणाली की, मला चित्रपट बघायला आवडतात आणि त्यात अभिनय करण्याची खूप आवड आहे. हा आत्मविश्वास तिला तिच्या आईकडून मिळाला. यावेळी तिने आवर्जून सांगितले की, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सिग्नेचर ज्वेलरी कलेक्शन लाँच होताना पाहून, तिचे वडील खूप आनंदी झाले होते आणि जाहिरातीचा व्हिडीओ पाहून भावूकही झाले.

The Trial : ‘द ट्रायल’साठी काजोलने मोडला स्वतःचाच नियम! ३१ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केलं ‘हे’ काम

नम्रताने आपल्या मुलाच्या अभिनय कारकिर्दीबद्दलही सांगितले. ती म्हणाले की, त्यांचा मुलगा गौतम देखील चित्रपटांमध्ये काम करू शकतो. परंतु, सध्या तो त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे. रिपोर्ट्सनुसार, महेश बाबूची ११ वर्षांची मुलगी सिताराला तिचा पहिला पगार म्हणून १ कोटी रुपये मिळाले. फार लहान वयातच ती एका ज्वेलरी ब्रँडचा चेहरा बनली आणि तिचे कलेक्शन टाइम्स स्क्वेअरवरही प्रदर्शित करण्यात आले.

महेश बाबू आणि नम्रता आपल्या मुलीच्या यशाने खूप आनंदी असून त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नम्रताने लिहिले की, ‘पाहा कुणीतरी नुकतेच टाइम्स स्क्वेअरमध्ये पदार्पण केले आहे.... मला तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे आणि तुझा किती अभिमान वाटतोय हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. तुझी स्वप्ने पूर्ण होताना पाहणे ही सर्वात सुंदर भावना आहे. अशीच चमकत राहा, माझी सुपरस्टार.’

Whats_app_banner