मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahesh Babu: साऊथ स्टार महेश बाबूलाही पडली ‘जवान’ची भुरळ; शाहरुख खानचं कौतुक करत म्हणाला...

Mahesh Babu: साऊथ स्टार महेश बाबूलाही पडली ‘जवान’ची भुरळ; शाहरुख खानचं कौतुक करत म्हणाला...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Sep 09, 2023 10:16 AM IST

Mahesh Babu Praises Shah Rukh Khan: एकीकडे ‘जवान’ला तुफान प्रतिसाद मिळत असताना, आता कलाकारही या चित्रपटाचे आणि शाहरुख खानचे कौतुक करत आहेत.

Mahesh Babu Praises Shah Rukh Khan
Mahesh Babu Praises Shah Rukh Khan

Mahesh Babu Praises Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान स्टारर 'जवान' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शाहरुख खान हा आता केवळ बी-टाऊनचा बादशाह राहिलेला नसून, त्याने आता साऊथ इंडस्ट्रीवरही दबदबा निर्माण केला आहे. साऊथचे सुपरस्टारही किंग खानचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. एकीकडे ‘जवान’ला तुफान प्रतिसाद मिळत असताना, आता कलाकारही या चित्रपटाचे आणि शाहरुख खानचे कौतुक करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘बाहुबली’ फेम प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस.एस. राजामौलीनंतर आता साऊथ सुपरस्टार महेश बाबूनेही 'जवान' आणि शाहरुख खानचे कौतुक केले आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्याने 'जवान'ला ब्लॉकबस्टर आणि शाहरुखला ‘किंग’ म्हटले आहे. महेश बाबू याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जवान... ब्लॉकबस्टर सिनेमा. अॅटलीने किंग साईज सिनेमा केलाय तोही किंग सोबतच! तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट नेहमीच घेऊन येतो. शाहरुख खानचा ऑरा, त्याचा करिष्मा आणि स्क्रीन प्रेझेन्स अतुलनीय आहेत... तो यात कमाल दिसला आहे!! जवान स्वतःचेच विक्रम मोडणार…’

Gadar 2: ‘गदर २’ने तोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड! ‘जवान’च्या वादळातही सनी देओलच्या चित्रपटाची हवा

महेश बाबूही ‘रोमान्स किंग’ शाहरुख खानचा चाहता झाला आहे. त्याने किंग खानचे जोरदार कौतुक केले. महेश बाबूच्या या पोस्टला शाहरुख खाननेही उत्तर दिले आहे. शाहरुख खानने महेश बाबूला धन्यवाद म्हटले आहे. शाहरुख खानने महेश बाबूची पोस्ट पुन्हा शेअर केली आणि लिहिले, ‘खूप खूप धन्यवाद. तुम्हाला चित्रपट आवडला हे ऐकून आता सगळेच खूप उत्साहित आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप प्रेम. तुमच्या या शब्दांमुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले आहे. आता दमदार मनोरंजनासाठी आणखी मेहनत करेन.’ विशेष म्हणजे 'जवान' रिलीज आधी देखील महेश बाबूने शाहरुख खानला शुभेच्छा दिल्या होत्या.

एकीकडे 'जवान' कमाईचे रेकॉर्ड मोडत आहे. तर, दुसरीकडे शाहरुख खान देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहिला आहे. शाहरुख खानने या उदंड प्रतिसादासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘जवान’ला दोन दिवसांत मिळालेले यश पाहून किंग खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट ट्विटमध्ये शेअर केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.

WhatsApp channel