मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahesh Babu: महेश बाबूवर दु:खाचा डोंगर, आईचे निधन

Mahesh Babu: महेश बाबूवर दु:खाचा डोंगर, आईचे निधन

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 28, 2022 09:06 AM IST

Mahesh Babu Mother Death: महेश बाबूच्या आईचे २८ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता निधन झाले आहे

इंदिरा देवी
इंदिरा देवी (HT)

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबूच्या आईचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा देवी या आजारी होत्या. आज, २८ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता त्यांचे निधन झाले आहे. त्या हैदराबाद येथील एआयजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

महेश बाबूच्या कुटुंबीयांनी इंदिरा देवी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. 'ज्येष्ठ अभिनेते कृष्णा आणि सुपरस्टार महेश बाबूची आई, इंदिरा देवी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांचे पार्थिव आज सकाळी ९ वाजता पद्मालय स्टुडिओमध्ये चाहत्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून नंतर महाप्रस्थानम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत' अशी माहिती महेश बाबूच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

सोशल मीडियाद्वारे अनेक जण इंदिरा देवी यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अनेक कलाकारांनी देखील सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते कृष्णा आणि इंदिरा देवी यांना पाच मुले. काही दिवसांपूर्वी महेश बाबूचे मोठे भाऊ रमेश बाबू यांचे निधन झाले. प्रकृतीशी संबंधीत काही आजारांमुळे त्यांचे निधन झाले. महेश बाबूने मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केले आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.

IPL_Entry_Point

विभाग