मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahesh Babu: महेश बाबूने शेअर केला नम्रतासोबत फोटो, दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Mahesh Babu: महेश बाबूने शेअर केला नम्रतासोबत फोटो, दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 02, 2024 10:07 AM IST

Mahesh Babu new year wishes: महेश बाबूने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्नी नम्रता शिरोडकरसोबतचा फोटो शेअर केला आहे.

Mahesh Babu
Mahesh Babu

२०२४ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांनी तयारी केली. सोशल मीडियावर फोटो शेअर कलाकारांनी सर्वांना शुभेच्छा. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबूने सोशल मीडियावर पत्नी नम्रता शिरोडकरसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महेश बाबूने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रोमँटिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने पत्नी नम्रता शिरोडकरसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नम्रताने काळ्या रंगाचा टीशर्ट आणि ट्रॅक पँट परिधान केली आहे. तर महेश बाबूने राखाडी रंगाचा टीशर्ट आणि पँट घातली आहे. या फोटोमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्याने 'उत्स्फूर्तता, हास्य, प्रेम, साहस' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: प्रभासची हवा!'सलार'ने १० दिवसांत पार केला ५०० कोटींचा पल्ला

सध्या सोशल मीडियावर महेश बाबूने शेअर केलेला हा फोटो चर्चेत आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. जवपास ९ लाख लोकांनी हा फोटो लाइक केला आहे.

काही दिवसांपूर्वी नम्रता आणि तिची मुले गौतम व सितारा हे हैदराबाद विमानतळावर दिसले. ते नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दुबईला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महेश बाबू देखील तिकडे गेला. नम्रताने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेता वरुण धवन, त्याची पत्नी नताशा दलाल, अभिनेत्री क्रिती सेनॉन एकत्र असल्याचे दिसत आहे. त्यांनी एकत्र नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.

WhatsApp channel