दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबू हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे. त्याचे लाखो चाहते आहेत. महेश बाबूच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. आता महेश बाबूची मुलगी सिताराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने एका कार्यक्रमात डान्स देखील केला आहे.
महेश बाबूने नुकताच 'डान्स इंडिया डान्स तेलुगू' या शोमध्ये हजेरी लावली. झी तेलुगू वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बाप-मुलीची कार्यक्रमात ग्रँड एण्ट्री दाखवण्यात आली आहे.
दरम्यान, महेश बाबूने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे. तर सिताराने ग्लिटरचा वनपिस परिधान केला आहे. या लूकमध्ये सितार सुंदर दिसत आहे. सितारा आणि महेश बाबू हातात हात घालून रेड कार्पेटवरुन चालताना दिसत आहेत. सिताराने कार्यक्रमात डान्स देखील केला आहे. सध्या सोशल मीडियावर सिताराची चर्चा रंगली आहे.
एका यूजरने 'सितारा डान्स करत असताना महेश बाबू मुलीकडे ज्या प्रकारे बघतोय ते पाहण्यासारखे आहे' असे एका यूजरने म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने 'पहिल्यांदाच महेश बाबू मुलगी सितारासोबत एका कार्यक्रमाला आला आहे' असे म्हटले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, महेश बाबूने डान्स इंडिया डान्स तेलुगू या शोमध्ये येण्यासाठी जवळपास ९ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या