Mahesh Babu Daughter Dance Video Viral: साऊथचा सुपरस्टार अभिनेता महेश बाबूची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने त्याने जगभरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. अभिनेता महेश बाबू याच्याप्रमाणेच त्याची लाडकी लेक सितारा देखील आता चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होत चालली आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. मॉडेलिंग ते समाजकार्य सगळ्यातच सिताराने मोठे नाव कमावले आहे. इतक्या लहान वयात देखील सितारा प्रचंड चर्चेत आली आहे. महेश बाबू आणि त्याच्या लेकीत खूप छान बाँडिंग आहे. दरम्यान आता सिताराने तिच्या वडिलांसाठी एक खास परफॉर्मन्स केला आहे. याचा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सिताराने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर आपल्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच तिने या व्हिडीओमध्ये वडील महेश बाबू यांनाही टॅग केले आहे. या डान्स व्हिडीओमध्ये सितारा तिच्या वडिलांच्या गाण्यावर लुंगी घालून दमदार डान्स करताना दिसली आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या डान्स स्टेप्स अगदी महेश बाबूच्या स्टेप्सप्रमाणेच आहेत. सिताराची एनर्जी पाहून चाहते देखील तिला वडिलांची कार्बन कॉपी म्हणत आहेत.
सितारा घट्टामेननी हिने हा व्हिडीओ शेअर करताना वडील अभिनेता महेश बाबू याला देखील टॅग केले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, 'हा व्हिडीओ फक्त तुमच्यासाठी आहे'. सिताराचा हा डान्स व्हिडीओ पाहून तिची आई नम्रता शिरोडकर हिनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नम्रता शिरोडकर हिने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले की, ‘तू आमचा अगदी बेस्ट फटाका आहेस’. या व्हिडीओमध्ये सिताराने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. यासोबत तिने साऊथ स्टाईलमध्ये लाल रंगाची लुंगी बांधली आहे आणि त्यासोबत पांढरे स्नीकर्स घातले आहेत. या साऊथ राऊडी लूकमध्ये सितारा खूप छान दिसत आहे.
सिताराच्या या पॉवर पॅक्ड डान्स परफॉर्मन्सवर चाहते देखील फिदा झाले आहेत. केवळ आई नम्रता शिरोडकरच नाही, तर नेटकरी देखील सिताराच्या प्रेमात पडले आहेत. सिताराच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा महापूर आला आहे. जगभरातील अनेक नेटकरी आणि चाहते सिताराच्या डान्सचे कौतुक करत आहेत.