Maharashtrachi Hasyajatra: कॉमेडीची हॅटट्रीक! पुन्हा सुरु होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtrachi Hasyajatra: कॉमेडीची हॅटट्रीक! पुन्हा सुरु होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम

Maharashtrachi Hasyajatra: कॉमेडीची हॅटट्रीक! पुन्हा सुरु होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 30, 2024 09:43 AM IST

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Maharashtrachi Hasyajatra
Maharashtrachi Hasyajatra

Maharashtrachi Hasyajatra: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहिला जातो. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमची नवी पर्वे, त्यामध्ये नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. पण काही दिवसांपूर्वी हा कार्यक्रम बंद झाला होता. तेव्हा चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कधी सुरु होणार चला जाणून घेऊया...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वामध्ये आपल्याला नक्कीच नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे. तब्बल ६ वर्षांहून जास्त काळ 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. त्यामुळे आता पुन्हा सुरु होणाऱ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात नेमकं काय पाहायला मिळणार याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

काय असणारे वेगळे?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात प्रेक्षकांनी यापूर्वी प्रहसनांच्या अनेक मालिका पाहिल्या. यांतून अनेक पात्रे लोकप्रिय झाली, पण ती पात्रे फक्त त्या-त्या मालिकेमध्ये पाहिली. या नव्या पर्वामध्ये वेगवेगळ्या मालिकांमधली पात्रे एकमेकांच्या मालिकांमध्ये जाऊन धमाल करताना प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या पर्वात हा नवा प्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहे. यातून नक्कीच मोठा हास्यकल्लोळ निर्माण होईल असे म्हटले जात आहे.

कधी सुरु होणार कार्यक्रम?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे आजवर ८००पेक्षा अधिक भाग प्रसारित झाले आहेत. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले असून प्रेक्षकांनीही त्यांच्या या आवडत्या कार्यक्रमाला भरपूर प्रेम दिले आहे. २ डिसेंबरपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', कॉमेडीची हॅटट्रीक हे नवे पर्व सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.
वाचा: पदेशात स्थायिक झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. 'तुजं माजं सपान' या मालिकेतून दिसलेला तिच्यातला मुळातला रांगडेपणा प्रेक्षकांना भावला होता. तोच अभिनय आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यवीरांसह रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी ठसकेबाज भाषा आता हास्यजत्राच्या मंचावर पाहायला मिळेल.

Whats_app_banner