सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. "महाराष्ट्राची हास्यजत्रा" हा कार्यक्रम नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या सिझनमध्ये काही तरी वेगळे पाहायला मिळणार असा अंदाज प्रेक्षक वर्तवत आहेत. एका नव्या अभिनेत्रीची एण्ट्री कार्यक्रमात झाली आहे. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया...
नवं सीजन म्हटलं कि काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार असे प्रेक्षकांना वाटते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक' या नव्या सिझनमध्ये नक्कीच काही तरी वेगळे पाहायला मिळणार आहे. त्यातील एक सरप्राईस पहिल्याच भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. तिच्यात मुळातच असलेला रांगडेपणा प्रेक्षकांना "तुज माज सपान" मालिकेतून भावला होता. तोच अभिनय आता महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यविरांसोबत रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आता हास्यजत्रेचा मंचावर पाहायला मिळणार आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक' या कार्यक्रमातील प्राजक्ता सादर करणार असलेल्या स्कीटमध्ये रांगडा गडी रोहित माने देखील असणार आहे. वनिता खरात, चेतना भट, नम्रता संभेराव देखील या स्कीटमध्ये प्राजक्ता सोबत आपल्याला पाहायला मिळतील. आता स्कीटमध्ये नक्की काय पाहायला मिळणार हे आपल्याला कार्यक्रमाचा भाग पाहिल्यावर कळेल. पण एवढं नक्की आहे की धमला स्कीट असणार आहे. कारण या स्कीटदरम्यान प्राजक्ता ने चक्क रोहित ला आपल्या खांद्यावर उचलून घेतला आहे. आपल्या रांगडेपणाचा आणि ताकदीची झलक प्राजक्ता ने या स्कीटमधून प्रेक्षकांना दाखवली आहे.
वाचा: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक
'महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक' हे नवं सिझन सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे. सोमवार ते बुधवार हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्री साडे नऊ वाजता या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षकांना घ्यायला मिळणार आहे.