'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं ओटीटीवर पदार्पण; कुठे पाहाल अभिनेत्याची वेब सीरिज? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं ओटीटीवर पदार्पण; कुठे पाहाल अभिनेत्याची वेब सीरिज? जाणून घ्या

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं ओटीटीवर पदार्पण; कुठे पाहाल अभिनेत्याची वेब सीरिज? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 23, 2024 04:19 PM IST

Purnime Cha Phera: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात काम करणारा निखिल बने एका वेब सीरिजमध्ये काम करत आहे. जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार ही वेब सीरिज

Purnime Cha Phera
Purnime Cha Phera

Nikhil Bane Web Series: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे निखिल बने. सोनी मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमातून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता निखिल बने ओटीटी विश्वात पदार्पण करत असल्याचे समोर आले आहे. त्याची एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही एक हॉरर वेब सीरिज असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

काय आहे वेब सीरिजची कथा ?

निखिल बनेच्या आगामी वेब सीरिजचे नाव 'पौर्णिमेचा फेरा' असे आहे. या सीरिजमध्ये तीन मित्र त्यांच्या मित्राच्या कोकणातील वडिलोपार्जित घरी भेट देतात. कोकणातला त्यांचा हा प्रवास, यादरम्यान घडलेली घटना, त्यात दडलेली रहस्ये यात पाहायला मिळणार आहेत. ही रहस्ये काय असतील? पौर्णिमेच्या चंद्राचा आणि या घटनांचा काय संबंध असेल, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील तर या सगळ्याची उत्तरे ही वेब सीरिज पाहून मिळतील. या वेबसीरिजचे चित्रीकरण मुंबईमधील काही भागांत आणि कोकणातील गुहागर येथे झाले आहे.

कोणते कलाकार दिसतायेत ?

अजय सरतपे दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये निखिल बने, मंदार मांडवकर, सिद्धेश नागवेकर, संजय वैद्य, प्राची केळुस्कर, संदीप रेडकर, दीपा माळकर, चंदनराज जामदाडे, स्नेहल आयरे, दर्शना पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शुभम विलास कदम यांची कथा असलेल्या या सीरिजचे संवाद, लेखन संदेश लोकेगावकर यांनी केले आहे.

कुठे पाहायला मिळणार ही वेब सीरिज ?

'पौर्णिमेचा फेरा' ही हॉरर कॉमेडी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही वेब सीरिज शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
वाचा: त्याने मला बेडरुममध्ये बोलावले अन्...; सोनालीने संजय दत्तसोबतच्या त्या सीनवर केले वक्तव्य

या वेब सीरिजची काय आहे खासियत ?

'पौर्णिमेचा फेरा' या वेब सीरिज बद्दल पायल कदम म्हणाल्या , "या वेबसीरिजचा जॉनर हॉरर कॉमेडी असून हा जॉनर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'पौर्णिमेचा फेरा' चे वैशिष्ट्य म्हणजे या कथेत रहस्य, रोमांच, भीती असतानाच त्याला कॉमेडीचा टच देण्यात आला आहे. खात्री आहे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.''

Whats_app_banner