Dattu More New House: महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणार कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा.' या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसते. सध्या विनोदवीर दत्तू मोरे हा चर्चेत आहे. चाळीत राहणाऱ्या दत्तू मोरेला म्हाडाची लॉट्री लागली आहे. या लॉट्रीमध्ये त्याला आलिशान घर मिळणार असल्याचे प्रेक्षकांना कळताच आनंद झाला आहे.
ठाण्यातील एका छोट्या चाळीत राहणाऱ्या दत्तूला म्हाडा कोकण मंडळाने काढलेल्या लॉटरीत दोन घरे लागली आहेत. ठाण्याच्या रौनक ब्लिझ आणि हायलँड स्प्रिग या दोन गृह प्रकल्पात त्याला घरे लागली आहेत. त्यामुळे आता दत्तू चाळीतून थेट आलिशान फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे. याबाबत चाहत्यांना कळताच सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.
वाचा: बॉक्स ऑफिसवर यामी गौतमची जादू, ८ दिवसात सिनेमाने कमावले कोट्यवधी रुपये
दत्तू मोरे हा ठाण्याचा आहे. वागळे इस्टेटमधील रामनगर येथील छोट्या चाळीत तो गेल्या काही वर्षांपासून राहात आहे. चाळकऱ्यांनी दत्तूची प्रगती पाहून चाळीचे नाव बदलून 'दत्तू चाळ' असे ठेवले आहे. या विषयी दत्तू मोरेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.
वाचा: अनंत अंबानीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमासाठी रिहानाने किती पैसे घेतले? मानधन वाचून बसेल धक्का
दत्तूने म्हाडाची लॉटरी लागल्यावर आनंद व्यक्त केला आहे. तो चाळीविषयी बोलताना म्हणाला, "पहिल्याच प्रयत्नात मला म्हाडाचे घर मिळाले याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. चाळीत राहताना इतरांप्रमाणे मी देखील उंच इमारतीत फ्लॅट खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र त्यावर काहीशा मर्यादा येत होत्या. पण आता माझे हे स्वप्न साकार झाले आहे. माझे बालपण चाळीत गेल्यामुळे फ्लॅट संस्कृतीत मी कितपत रमेन, हे मला माहित नाही. तरीही मी नव्या घरात राहायला गेलो तरी चाळीबाबत माझ्या मनात कायमच अत्मियता राहिल"
वाचा: चॅनेलचा दबाव झुगारून...; ‘मुलगी झाली हो’चा उल्लेख करत किरण मानेची पोस्ट
एकीकडे दत्तू मोरेला म्हाडाची लॉटरी लागली आहे. तर दुसरीकडे त्याच्या बायकोने ठाण्यात क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी दत्तूने एक पोस्ट शेअर केली आहे. "घुनागे हॉस्पिटलनंतर .. बायकोच ठाण्यातल पाहिलं क्लिनिक..अजून एक नवीन सुरूवात...प्रिय बायको..तुला खूप-खूप शुभेच्छा आणि खूप-खूप प्रेम" असे दत्तूने पोस्टमध्ये म्हटले होते.
संबंधित बातम्या