महाराष्ट्राची हास्यजत्रा या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील तिचे स्कीट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी वनिताने सुमित लोंढेशी लग्न केले. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता वनिताचा उखाणा घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सध्या जगभरात धुळवड हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काल होळी आनंदाने साजरी केली गेली. नुकताच वनिताने देखील कुटुंबीयांसोबत होळी हा सण साजरा केला. लग्नानंतरची वनिताची ही पहिलीच होळी आहे. त्यामुळे ती कुटुंबीयांसोबत होळी साजरी करताना दिसली. होळी साजरी करताना वनिताने उखाणा घेतला आहे. तिने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा: शरद पोक्षेंचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्यास नकार, काय आहे कारण?
लग्नानंतर वनिताची पहिली होळी असल्यामुळे ती नटूनथटून होळीची पूजा करण्यासाठी गेली होती. तिने आकाशी रंगाची साडी नेसली होती. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये वनिता अतिशय सुंदर दिसत आहे. तिने होळीची पूजा केल्यानंतर 'होळीवर माळ चढवली होती हिरव्या गुलाबी गोंड्यांची, सुमितरावांचं नाव घेते झाले मी सून लोढ्यांची' असा उखाणा वनिताने घेतला आहे.
वाचा: 'या' कारणामुळे इम्रान हाश्मीने आलियासोबत किसिंग सीन देण्यास दिला होता नकार
वनिताने फोटोग्राफर सुमित लोंढेशी लग्न केले आहे. सुमित हा प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. सोबतच तो ब्लॉगरदेखील आहे. वनिताने छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात काम करण्यासोबत तिने सरला एक कोटी या चित्रपटात देखील काम केले आहे. या चित्रपटात तिने गुंड्डी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे वनिताला विशेष लोकप्रियता मिळाली. वनिताच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते.