'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi
May 13, 2024 02:44 PM IST

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गौरव मोरेला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आता वैतागून त्याने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.

अभिनेता गौरव मोरे झाला ट्रोल
अभिनेता गौरव मोरे झाला ट्रोल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. त्याने विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. आता गौरव हिंदी मालिकांमध्ये काम करताना दिसत आहे. त्याचे सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी गौरवला ट्रोल केले आहे. गौरव देखील शांत बसला नाही. त्याने ट्रोलर्सला चांगले सुनावले आहे.

गौरव सध्या ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात दिसत आहे. या हिंदी कार्यक्रमात त्याच्यासोबत अभिनेता कुशल बद्रिके व अभिनेत्री हेमांगी कवीन स्किट सादर केले आहे. या स्किटचा व्हिडीओ गौरवने सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत गौरवला चांगलेच ट्रोल केले आहे.
वाचा: 'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

गौरव मोरे कमेंट
गौरव मोरे कमेंट

नेटकऱ्याने गौरवची तुलना केली रानू मंडलशी

एका यूजरने लांबलचक कमेंट करत गौरवला चांगलेच सुनावले आहे. “रानू मंडल झालाय बिचारा गौरव, फेम मिळाले आणि स्वतःला खूप महान समजायला लागला. त्याला वाटले ऑनलाइन फॅन्स त्याचे चित्रपट बघत असतील, शोचा टीआरपी वाढवतील. पण प्रत्यक्षात वेगळेच होत आहे आणि पुढे पण असेच दिसणार. एका पॉइंटला सगळे हातातून जाणार… चांगला अभिनेता होता म्हणून प्रचंड वाईट वाटते असे थुक्रट विनोद मारताना बघून, भोजनेचे पण तसेच झाले आहे. नशिबात जे लिहिलय तेच होणार” अशी कमेंट एका यूजरने केली आहे. ही कमेंट पाहून गौरव मोरेने संताप व्यक्त केला आहे. त्याने, “आधी स्वतःच्या अकाउंटवरून बोला, मग आमच्याबद्दल बोला, बाकी गरमी मस्त एन्जॉय करा” असे म्हटले आहे.
वाचा: वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

यूजरने दिले पुन्हा गौरवला उत्तर

गौरवची कमेंट पाहून नेटकरी देखील शांत बसला नाही. त्याने पुन्हा “मग हे अकाउंट कोणाचे आहे ? स्वतःच्या अकाउंटवरुन म्हणजे नक्की काय असते ? स्वतःचे नाव मेंशन असलेले अकाऊंट? म्हणजे नाव बघून रिप्लाय देणार की खरा फोटो बघून त्यावर कमेंट करणार?” असे म्हटले आहे. त्यानंतरही दोघांमधील वाद सुरुच होता.
वाचा: बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

Whats_app_banner