भाऊ, पाय पुरतात का?; नवी गाडी खरेदी केल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे झाला ट्रोल-maharashtrachi hasyajatra fame dattu more gave epic reply to troller ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  भाऊ, पाय पुरतात का?; नवी गाडी खरेदी केल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे झाला ट्रोल

भाऊ, पाय पुरतात का?; नवी गाडी खरेदी केल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे झाला ट्रोल

Aarti Vilas Borade HT Marathi
May 28, 2024 02:09 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील दत्तू मोरेने काही दिवसांपूर्वी एक गाडी खरेदी केली. पण यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

दत्तू मोरे झाला ट्रोल
दत्तू मोरे झाला ट्रोल

सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. यामध्ये गौरव मोरे, वनिता खरात, समीर चौघुले, ओंका राऊत, दत्तू मोरे यांचा समावेश आहे. या कलाकारांचा एक वेगळा चाहता वर्ग देखील निर्माण झाला आहे. आता दत्तू मोरेने वाढदिवशी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.

दत्तू मोरेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवशी नवी बाईक खरेदी केल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला होता. पण काही चाहत्यांनी मात्र दत्तूची खिल्ली उडवली. त्याला बाईक घेतल्यामुळे ट्रोल केले. ते पाहून दत्तू देखील शांत बसला नाही. त्याने ट्रोल करणाऱ्या यूजरला चांगलेच सुनावले आहे.
वाचा: अरे हाय काय अन् नाय काय;'गेला माधव कुणीकडे' नाटक पुन्हा पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा

काय होती दत्तू पोस्ट?

दत्तू मोरेने २०२३ रोजी गुपचूप लग्न केले. त्याच्या लग्नाचे फोटो पाहून सर्वजण चकीत झाले होते. लग्नानंतर दत्तूने एक रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दत्तूच्या पत्नीने स्वातीने त्याला नवी बाईक गिफ्ट म्हणून दिली आहे. या बाईकचा व्हिडीओ शेअर करत दत्तूने बायकोचे आभार मानले होते.
वाचा: 'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक

नेटकऱ्यांनी केले ट्रोल

दत्तूच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. अनेकांनी त्याला नव्या बाईकबद्दल शुभेच्छा दिल्या. पण या सगळ्या कमेंटमधील एका कमेंटने दत्तूचे लक्ष वेधले. एका यूजरने भाऊ राग नका येऊ देउ पण तुमचे पाय पुरतात का त्या गाडीहून……’ असा सवाल केला होता. त्याच्या या खोचक कमेंटला दत्तू यानेही अगदी मजेशीर उत्तर दिलं. ‘हो, म्हणूनच घेतली ‘ असे लिहीत दत्तू याने हसण्याच्या अनेक ईमोजीही त्या पोस्टवर टाकल्या. दत्तू याने ही कमेंट स्पोर्टिव्हली घेतली मात्र इतरांना मात्र त्या इसमाची ही कमेंट काही आवडली नाही, काहींनी तर त्याला थेट सुनावलंही. ‘ भाऊ, कधी तरी मराठी माणसाला सपोर्ट करा की’ असं लिहीत दुसऱ्या चाहत्याने त्याला खडसावलं.
वाचा: सागरने सांगितले आदित्यते सत्य, काय असणार मुक्ता आणि माधवीची प्रतिक्रिया? ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये काय घडणार