Hasya Jatra: हास्याची नॉनस्टॉप पार्टी! 'या' दिवशी दिवसभर असणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hasya Jatra: हास्याची नॉनस्टॉप पार्टी! 'या' दिवशी दिवसभर असणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

Hasya Jatra: हास्याची नॉनस्टॉप पार्टी! 'या' दिवशी दिवसभर असणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 29, 2023 02:02 PM IST

Maharashtrachi Hasya Jatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा!' हा कार्यक्रम सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. आता हा कार्यक्रम एक संपूर्ण दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Maharashtrachi Hasya Jatra
Maharashtrachi Hasya Jatra

संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा.' घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा 'सहकुटुंब हसू या' म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचे काम अविरत करत आली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा.' या वर्षात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता वर्षअखेरीस अधिकाअधिक मनोरंजन करता यावे यासाठी हा कार्यक्रम एक संपूर्ण दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील ३१ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस प्रेक्षकांना आवडलेली या वर्षभरातली प्रहसने दिवसभर दाखवली जाणार आहेत आणि रात्री ९ वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहायला मिळणार आहे!
वाचा: राजेश खन्ना यांच्या आठवणीत ट्विंकलने शेअर केलेले खास फोटो

सोनी मराठी वाहिनी ही नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीचा मान ठेवत आलेली आहे. नवनवीन उपक्रम राबवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची कला त्यांना अल्पावधीतच अवगत झाली आहे. या वर्षभरातील तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका निर्मळ आनंद घेता यावा म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' वर्षअखेरीस संपूर्ण दिवस आपल्या भेटीस येणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट आनंद द्विगुणित करणारी आणि औत्सुक्याची असणार आहे! या जत्रेतली मंडळी प्रेक्षकांचे नवीन वर्ष हसरे करण्यासाठी आता सज्ज झाली आहेत. ३१ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि रात्री ९ वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner