मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  खूशखबर! महाराष्ट्राची हास्यजत्रा आता सगल २२ तास

खूशखबर! महाराष्ट्राची हास्यजत्रा आता सगल २२ तास

Aarti Vilas Borade HT Marathi
May 19, 2022 03:27 PM IST

सकाळी सात वाजल्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा
महाराष्ट्राची हास्यजत्रा (HT)

अल्पावधीत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आता नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी, 22 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून हा कार्यक्रम सलग 22 तास सोनी मराठी वाहिनीवर सुरू असणार आहे. या कार्यक्रमाचे 500 पेक्षा जास्त भाग पूर्ण झाले आहेत.

सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम हास्यपंचमी साजरी करतो आहे. कारण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आठवड्यातून पाच दिवस पाहण्यास मिळतो आहे. येत्या रविवारी सलग २२ तास हा कार्यक्रम सोनी मराठीवर पाहता येणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं आहे.

हास्यवीरांनी आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी प्रेक्षकांना नवी उमेद दिली आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचं मनोरंजन करत होता. टेन्शनवरची उत्तम मात्रा असणाऱ्या या कार्यक्रमात हास्याचे अनेक फवारे उडणार आहेत. सध्या प्रत्येक भागात मोठमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर  उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवताहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सलग २२ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. हा रविवार सगळ्यांसाठीच खास आणि मनोरंजनात्मक ठरणार आहे.

WhatsApp channel

विभाग