संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा.' घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा सहकुटुंब हसू या म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करीत आलेली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा.' आता मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता ओंकार भोजनेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचा निरोप घेतला होता. आता त्याची या कार्यक्रमात पुन्हा एण्ट्री होणार आहे. प्रेक्षकांसाठी हा सुखद धक्काच आहे.
अगं अगं आई.. खास शैलीतले हे शब्द आपल्या कानावर पडता क्षणी ओंकार भोजने डोळ्यांसमोर उभा राहतो. पुन्हा एकदा तोच आवाज.. तेच पात्र आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे म्हटलं तर... होय होय, अगदी खरं... जे ऐकलं ते अगदी खरंय... सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मंच पुन्हा एकदा विनोदाच्या आतशबाजीने दणाणून सोडायला ओंकार भोजने पुन्हा एकदा या मंचावर पाहता येणार आहे.
वाचा: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित निवडणूक रिंगणात? 'या' पक्षाकडून लढणार असल्याची चर्चा
ओंकारने उडवून दिलेले हास्याचे बार बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा पाहाता येणार आहेत. ओंकार 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत एका खास निमित्ताने येतोय. येत्या शनिवारी, १८ नोव्हेंबर आणि रविवारी १९ नोव्हेंबर या दोन्ही भागांमध्ये ओंकार दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आगामी भागाची उत्सुकता पाहायला मिळते.