मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, खरेदी केले नवे घर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, खरेदी केले नवे घर

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 30, 2024 08:40 AM IST

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परबने एका मुलाखतीमध्ये चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने नवे खर खरेदी केले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, खरेदी केले नवे घर
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, खरेदी केले नवे घर

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहिला जातो. या कार्यक्रमातील अभिनेत्री शिवाली परबी हीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. तिच्या विनोदाचा अचूक टायमिंग प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करुन शिवाली परब इथपर्यंत पोहोचली आहे. आता शिवालीने सोशल चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. तिने नवे घर खरेदी केल्याची माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवालीने नुकताच 'मिडिया टॉल्क मराठी' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केले. तिने खासगी आयुष्यापासून ते वैयक्तीत आयुष्यापर्यंत सर्वावर वक्तव्य केले. येत्या मे महिन्यात शिवालीचा वाढदिवस आहे. त्यापूर्वीच तिने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. तिने एक नवे घर खरेदी केले आहे. हे घर घेतल्यानंतर शिवालीचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे.
वाचा: 'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली

मुलाखतीमध्ये शिवालीला तिच्या वाढदिवसाची काय खास तयारी केली आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने, “यंदा वाढदिवसासाठी असे काही स्पेशल केलेले नाही. आता जी गोष्ट मी सांगतेय ती गोष्ट अजून मी कुठेच सांगितलेली नाही. पण, आता सांगते… मी घर घेतले आहे. या नवीन घराची पूजा मी १० तारखेला म्हणजेत १० मे रोजी ठेवलेली आहे. हे सगळ नक्कीच प्रेक्षकांमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे हा वाढदिवस माझ्यासाठी खरंच खूप जास्त खास असणार आहे” असे उत्तर दिले.
वाचा: अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

कधी पाहायला मिळणार घराची झलक?

शिवाली १० मे रोजी नवीन घरात राहायला जाणार आहे. तेव्हाच ती प्रेक्षकांना नव्या घराची झलक दाखवणार आहे. शिवालीने मुंबईत घर घेतले आहे की पुण्यात याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच शिवालीने घराची झलक देखील १० मे रोजी दाखवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. गेल्या काही दिवसांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील काही कलाकारांनी नवीन गाड्या व नवीन घर घेतल्याचे पाहायला मिळाले. आता या यादीमध्ये शिवाली परबचे नाव जोडले गेले आहे.
वाचा: अभिनेत्री जुई गडकरी हिला जेलमध्ये टाकण्याची धमकी, काय आहे नेमकी भानगड? जाणून घ्या

शिवालीच्या कामाविषयी

शिवालीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात दिसत आहे. तसेच तिचे ‘हार्टबीट वाढणार हाय’ हे गाणे नुकताच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात शिवालीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. शिवालीला या वेगळ्या अंदाजात पाहून सर्वांना आनंद झाला आहे.

IPL_Entry_Point