मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’मध्ये मृणाल कुलकर्णीला मिळाले दोन पुरस्कार, जाणून घ्या कोणत्या सिनेमासाठी

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’मध्ये मृणाल कुलकर्णीला मिळाले दोन पुरस्कार, जाणून घ्या कोणत्या सिनेमासाठी

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 13, 2024 09:46 AM IST

Maharashtracha Favourite Kon 2023: दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात याकडे सर्वांचे लक्ष लागले असता अभिनेत्री मृणाल कुलर्णीला पुरस्कार मिळाल्याचे समोर आले आहे.

Maharashtracha Favourite Kon
Maharashtracha Favourite Kon

मराठी चित्रपटसृष्टीमधील मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' दरवर्षी नव्या वर्षात या पुरस्कार सोहळ्याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहात असतात. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी कोणाची निवड केली आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. अशातच अभिनेत्री मृणाल कुलकर्णीला ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ २०२३मध्ये दोन पुरस्कार मिळाल्याचे समोर आले आहे. आता त्यांना कशासाठी हा पुरस्कार मिळाला हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात सुभेदार या सिनेमातील जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षक पसंतीतून दिला जाणारा महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. शिवराज अष्टक मालिकेतील पाचवे पुष्प असलेल्या ‘सुभेदार’ या सिनेमातील जिजाऊंच्या भूमिकेसाठी मृणाल कुलकर्णी स्पर्धेत होत्या. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या भूमिकेला पसंतीचा कौल दिला आणि ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३’ या पुरस्कारावर मृणाल कुलकर्णी यांचे नाव कोरले गेले.
वाचा: कलाकाराच्या जगण्याचा आकांत मांडणारं कथानक; तुम्ही पाहिलंत का ‘घुंगराची चाळ’?

पुरस्कार मिळाल्यानंतर मृणाल यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज*यांचा इतिहास ,पराक्रम ,स्वराज्यध्यास वाचत आणि पाहत घडलेल्या पिढीची मी पण एक भाग आहे. व्यक्ती म्हणून शिवराज्य समजून घेणे मला नेहमीच भावतं पण अभिनेत्री म्हणून मला शिवराज्याने जास्तच घडवले याचा अभिमान वाटतो .’महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३’ या झी टॉकीज वाहिनीने जाहीर केलेल्या पुरस्कार सोहळ्यात मला एक नव्हे तर दोन पुरस्कार दिले. पहिला पुरस्कार म्हणजे सुभेदार या सिनेमातील जिजाऊ आऊसाहेब जिजाबाई या भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या पसंतीचा ‘महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री’ हा पुरस्कार तर दुसरा पुरस्कार म्हणजे शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब जिजाबाई यांची भूमिका साकारण्याची संधी हा माझ्यासाठी पुरस्कारापेक्षा कमी सन्मान नाही” असे त्यांनी म्हटले आहे.

कुठे पाहाता येणार पुरस्कार सोहळा?

१८ फेब्रुवारी २०२४ ला संध्याकाळी ७ वाजता ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३’ हा सोहळा झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता या पुरस्काराबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

WhatsApp channel

विभाग