Maharashtra Bhushan Ashok Saraf: मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सगळ्याच स्तरांतूनत्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. आता अशोक सराफ यांच्या मुलाने देखील आपल्या वडिलांसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. अनिकेत सराफ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
मुलांनी यश मिळवलं की, पालक त्यांचं तोंडभरून कौतुक करतात. मात्र, यावेळी उलट पाहायला मिळालं आहे. अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा मुलगा अनिकेत सराफ याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या वडिलांचं भरपूर कौतुक केलं आहे. अनिकेत सराफ याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनिकेत याने वडील अशोक सराफ यांच्यासोबत वेगवेगळ्या फोटो पोज दिल्या आहेत. या फोटोमध्ये वडील आणि मुलाचे सुंदर नाते बघायला मिळाले आहे. दोघांचा हा क्युट फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
या फोटोसोबत कॅप्शन लिहिताना अनिकेत सराफने लिहीले की, ‘माझ्या वडिलांनी एक अभिनेता आणि एक माणूस म्हणून जे काही मिळवलंय, त्याबद्दल आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला त्यांचा अभिमान वाटत आला आहे. आता त्यांना अगदी प्रतिष्ठित मानला जाणारा महाराष्ट्र भूषणहा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो.’ अनिकेत सराफ याची आपल्या वडिलांसाठीची खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टवर नेटकरी आणि कलाकार कमेंट करून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
नुकतीच महाराष्ट्र सरकारच्यावतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मनोरंजन विश्वातील अमुल्य योगदानासाठी अशोक सराफ यांना‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३’देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अभिनेते अशोक सराफ यांनी देखील या पुरस्कारावर आपला आनंद व्यक्त केला आहे. अभिनेते अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे,तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले,असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले होते. तब्बल मागची ५ दशकं मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेते अशोक सराफ यांना‘अभिनय सम्राट’म्हटले जाते. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अशोक सराफ यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.