Shah Rukh Khan-Salman Khan At CM Oath Ceremony : भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अनेक व्हीआयपी पाहुणे आले होते. या शपथविधी सोहळ्यात बॉलिवूड स्टार्सची ही गर्दी पाहायला मिळाली. सलमान खान, रणबीर कपूर आणि सलमान खान या सोहळ्याला उपस्थित होते. सलमान खान आणि शाहरुखचा हा फोटोही समोर आला आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांना मिठी मारताना दिसले.
सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल हॉट आहे. या फोटोमध्ये सलमान खान, शाहरुख खानला मिठी मारताना दिसत आहे. सलमान खान गेल्या काही काळापासून त्याच्या सुरक्षेमुळे चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाहा सलमान आणि शाहरुखचा फोटो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स उपस्थित होते. यामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत रणबीर कपूर, माधुरी दीक्षित आणि रणवीर सिंह सारखे प्रमुख कलाकारही होते. रणबीर कपूर या सोहळ्यात पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजामा आणि जॅकेटमध्ये दिसला, ज्यामुळे त्याचा साधा आणि सोज्वळ लूक पाहायला मिळाला. रणवीर सिंह मात्र त्याच्या विशिष्ट स्टाईलमध्ये काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये आकर्षक दिसला, त्याच्या फॅशनेबल आणि हटके लूकमुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. माधुरी दीक्षित पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अप्रतिम दिसली, ज्यामुळे तिचा पारंपारिक आणि आकर्षक लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड कलावंतांची आणि प्रमुख व्यक्तींची मोठी उपस्थिती होती. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, रणबीर कपूर, रणवीर सिंह यांसारख्या बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय, क्रिकेट जगताचे महानायक सचिन तेंडुलकर आपल्या पत्नीसोबत उपस्थित होते. उद्योगजगतातून रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी, त्यांचे बंधू अनिल अंबानी आणि एचडीएफसीचे दीपक पारेख देखील शपथविधीला उपस्थित होते.
संबंधित बातम्या