महाकुंभ मेळ्यात फुटपाथवर रुद्राक्ष आणि फुले विकणाऱ्या एका अतिशय सुंदर तरुणीचा फोटो इन्फ्लूएंसरने शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या तरूणीचे नाव मोनालिसा आहे. जे लोक महाकुभ मेळ्याला गेले नाहीत त्यांना देखील मोनालिसा कोण आहे याची माहिती आहे. आता व्हायरल झालेल्या मोनालिसाचे नशीब फळफळले आहे. तिला एका चित्रपटाची ऑफर आली आहे.
चित्रपट निर्माते सनोज मिश्रा यांनी आगामी ‘मणिपूर’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची मोनालिसाला ऑफर दिली. मोनालिसा आणि तिच्या कुटुंबीयांनी हा चित्रपट करण्यास सहमती दर्शविली आहे. या चित्रपटात मोनालिसा सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल ते जून या कालावधीत ईशान्य भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाईल. शूटिंग करण्यापूर्वी मोनालिसाला तीन महिने मुंबईत अभिनय प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मोनालिसा सोशल मीडिया सेन्सेशन बनल्यानंतर अनेकजण तिला भेटण्यासाठी येऊ लागले. तसेच काही तरूणांनी मोनालिसासोबत गैरवर्तन केले. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला घरी पाठवले. मोनालिसा ही मध्य प्रदेशातील महेश्वर येथील आहे. चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा आणि त्यांची टीम दोन दिवसांनंतर महेश्वरला जातील आणि मोनालिसा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना भेटतील. ‘एबीपी न्यूज’वरील मोनालिसाची मुलाखत पाहिल्यानंतर दिग्दर्शक सनोज मिश्रा प्रयाग्राज महाकुभ येथे आले आहेत. तो येथे येऊन तिच्या कुटुंबातील सदस्यांना भेटला.
वाचा: राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास, अजामीनपात्र वॉरंट जारी
कुटुंबातील सदस्यांसह मोबाइल फोनवर मोनालिसा आणि तिच्या वडिलांशी सनोज मिश्रा यांचे संभाषण झाले आहे. सनोज मिश्राच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात काम मिळण्याची ऑफर ऐकून मोनालिसा आणि तिचे कुटुंबीय खूप आनंदी आणि उत्साहित आहेत. त्यांच्या मते, या चित्रपटात काम मिळाल्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबातील गरिबी संपून आर्थिक स्थिती चांगली होईल. मोनालिसाची आजी म्हणते की तिच्या नातीची अनेक वर्षांची इच्छा चित्रपटात काम मिळाल्याने पूर्ण होईल.
संबंधित बातम्या