एकेकाळी बॉलिवूड गाजवणारा लोकप्रिय अभिनेता साहिल खानला 'महादेव बेटिंग ॲप' प्रकरणी छत्तीसगढ येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात हाय कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साहिल खान हा फरार झाला होता. शेवटी आज एसआयटीच्या पथकाने त्याला छत्तीसगडमध्ये अटक केली. आता या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. साहिल खानला १ मे पर्यंत पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे.
'महादेव बेटिंग ॲप'चा प्रचार केल्याप्रकरणी साहिल खानला जवळपास चार दिवस पोलीस कोठडीत घालवावे लागणार आहेत. रविवारी सकाळी साहिल खानला मुंबई हायकोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी साहिलला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले असून हायकोर्टात हजर केले. न्यायालयाने साहिलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाचा: अमिताभ बच्चन यांचं शेजारी व्हायचंय? मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड
'महादेव बेटिंग ॲप'मध्ये सर्वसामान्यांना विविध खेळांवर पैशांचा सट्टा लावण्याचे आमिष दाखवले जाते. या ॲपची सर्व सूत्रे आणि संकेतस्थळे परदेशातून नियंत्रीत केली जात होती. या ॲपचा ऑपरेटर म्हणून अभिनेता साहिल खानचे नाव समोर आले. त्यामुळे त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. माटुंहा पोलिसांनी याच प्रकरणी यापूर्वी ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
वाचा: ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत
साहिल खानवर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित गुन्हे तर दाखल करण्यात आले आहेत. तसेच आणखी एक बेटिंग ॲप चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय साहिल खानवर फक्त ॲप प्रमोशनच नाही तर ॲप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी दुबईमधील एका ऑनलाइन बेटिंग ॲपच्या पार्टीमध्ये देखील तो दिसला होता. त्याचा पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण ते केवळ प्रमोशन असल्याचे सांगत दिशाभूल करण्यात आली होती. आता महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपचा ऑपरेटर म्हणून नाव समोर येताच साहिल खान अडचणीत सापडला आहे.
वाचा: चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कमल हासन यांच्या लेकीचा ब्रेकअप, काय आहे कारण?